You are currently viewing सावंतवाडीत एनडीआरएफची तुकड़ी दाखल

सावंतवाडीत एनडीआरएफची तुकड़ी दाखल

अतिवृष्टिच्या ईशाऱ्यामुळे दक्षता

सावंतवाडी

हवामान विभागाने कोकणात सलग चार दिवस अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून, ढग फुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सुरक्षेच्या दृष्टीने एक एन डी आर एफ ची तुकडी सावंतवाडी तालुक्यात दाखल झाली आहे. यावेळी माहिती देताना तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले की, असनिये, शिंरशिगे, आणि बांदा या भागांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

यावेळी या तुकडीचे असिस्टंट कमांडर जस्टिन जोजफ यांनी माहिती देताना सांगितले की, यावेळी सावंतवाडी तालुक्यात २१ जणांची तुकडी दाखल झाली असून, यामध्ये रोक्सी नावाचा कुत्र्याचा देखील समावेश आहे. तसेच एक टीम कुडाळ तालुक्यात देखील दाखल झाली असल्याची माहिती दिली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस ही तुकडी तालुक्यात असणार आहे. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे म्हणाले की, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार तालुक्यात बांदा, शिरशिंगे, असनिये या भागात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ११ जुन ते १३ जुन मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =