You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष यांचे कार्यकर्ते तसेच काँग्रेस प्रेमींना काँग्रेस सोशल मीडिया जॉईन करण्यास आवाहन…..

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष यांचे कार्यकर्ते तसेच काँग्रेस प्रेमींना काँग्रेस सोशल मीडिया जॉईन करण्यास आवाहन…..

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडियाची सभा आज कणकवली  विधानसभे मधील कणकवली तालुका काँग्रेस कार्यालय व कुडाळ-मालवण विधानसभे मधील कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे जिल्हाध्यक्ष कु. केतनकुमार गावडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी  जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थित  पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तसेच काँग्रेस प्रेमी यांना सोशल मीडिया संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच भाजपाकडून  होणाऱ्या काँग्रेसच्या  अपप्रचाराला  सोशल मीडियाच्या  माध्यमातून चोख प्रत्युत्तर मिळेल असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या माध्यमातून झालेली विकास कामे व विकास योजना जनतेपर्यंत  पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षामार्फत “जॉईन काँग्रेस सोशल मीडिया” हे अभियान संपूर्ण देशभरात सुरू करण्यात आलेले आहे. या अभियानामध्ये सहभागी होणे साठी 1800 1200 00044 या नंबर वर मिस कॉल द्या, तुम्हाला  एक लिंक येईल त्यावर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन करा व या माध्यमातून सोशल मीडिया जॉईन करून आपला देश वाचवण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष यांनी केले. या अभियाना अंतर्गत आम्ही तरुणांना व्यासपीठ निर्माण करण्याचे काम करणार आहोत असे देखील श्री. गावडे म्हणाले.  या अभियानात  सहभागी होण्यासाठी  सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाच्या वतीने  तुम्हाला  सर्व तालुका  काँग्रेस कार्यालयात फॉर्म  उपलब्ध  करून दिलेला आहे.  तरी इच्छुकांनी फॉर्म भरून सहकार्य करावे. काँग्रेसने केलेली विकास कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून  कशाप्रकारे  जनतेपर्यंत  पोहोचविता येतील यासंबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी कणकवली मधील सभेत जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष  नागेश मोर्ये, तालुकाध्यक्ष   प्रदीप मांजरेकर, शहराध्यक्ष महेश तेली, युवक काँग्रेस कार्याध्यक्ष  किरण टेंबुलकर, प्रदेश सोशल मीडिया सचिव  सौ. गौरी तेली, कणकवली विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष  सजाउद्दीन सोलकर, महिला शहराध्यक्ष सौ. पद्मिनी कांबळे, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कुडाळ- मालवण मधील सभेत  जिल्हा  काँग्रेस उपाध्यक्ष  विजय प्रभू, जिल्हा सरचिटणीस  प्रकाश जैतापकर,  अभय शिरसाट विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष  मंदार शिरसाट, कुडाळ महिला तालुकाध्यक्ष सुंदरवल्ली स्वामी, संदेश कोयंडे तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस सोशल मीडिया जॉईन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष कु. केतनकुमार गावडे यांच्या संबंधित ( 992293 3540 )  मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा