You are currently viewing जिल्हा बँकेवर अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीच सत्ता

जिल्हा बँकेवर अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीच सत्ता

विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना पराभवाचा धक्का; महाविकास आघाडी-८, भाजप-११ जागांवर विजय..

सिंधुदुर्ग

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीत राणेंनी बाजी मारली आहे. १७ जागांचा निकाल हाती आला असून यामध्ये भाजपकडे ११ तर महाविकास आघाडीकडे ८ जागा राहिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केलेले परिश्रम निष्फळ ठरले आहेत. भाजपच्या उमेदवारांकडून बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत आणि उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघ
राजन तेली (भाजप)- पराभूत,सुशांत नाईक (महावि. आघा.)- विजयी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलीचा पराभव झाला आहे.सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू विजयी झाले आहेत.

देवगड विकास संस्था भाजपचे प्रकाश बोडस विजयी ,वैभववाडी
भाजपचे दिलीप रावराणे विजयी,वेंगुर्ले भाजपचे मनीष दळवी विजयी,भाजपचे महेश सारंग विजयी,भाजपचे अतुल काळसेकर विजयी,कणकवली
भाजपचे विठ्ठल देसाई विजयी,
भाजपचे बाबा परब विजयी असा निकाल हाती आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक पंचवार्षिक निवडणूकीसाठी पतसंस्था मतदार संघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली विरुद्ध शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात झालेल्या लढतीत सुशांत नाईक यांनी राजन तेलींचा पराभव केला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत
१९ जागांचे निकाल जाहीर महाविकास आघाडी-८,भाजप-११ जागांवर विजय झाला आहे.

विजयी उमेदवार

1)दिलीपराव राणे (भाजप विजयी)
2)सुशांत नाईक (शिवसेना विजयी)
3)विठ्ठल देसाई (भाजप विजयी)
4)प्रकाश बोडस (भाजप विजयी)
5)मनीष दळवी (भाजप विजयी)
6)संदीप उर्फ बाबा परब (भाजप विजयी)
7)अतुल काळसेकर (भाजप विजयी)
8)महेश सारंग (भाजप विजयी)
9)मेघनाथ धुरी (काँग्रेस विजयी)
10)गजानन गावडे (भाजप)
11)रवींद्र मडगावकर (भाजप)
12)समीर सावंत (भाजप)

पराभुत उमेदवार

1)दिगंबर पाटील(पराभुत)
2)राजन तेली(पराभुत)
3)सतीश सावंत(पराभुत)
4)अविनाश माणगावकर(पराभुत)
5)विलास गावडे(पराभुत)
6)विनोद मर्गज(पराभुत)
7)सुरेश दळवी(पराभुत)
8)एम.के गावडे(पराभुत)
9)गुलाबराव चव्हाण(पराभुत)
10)मनीष पारकर(पराभुत)
11)लक्ष्मण आगणे(पराभुत)
12)विलास सावंत (पराभुत)

प्रतिक्रिया व्यक्त करा