You are currently viewing वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून तळवडेत सात फूटी नागराजाला जिवदान

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून तळवडेत सात फूटी नागराजाला जिवदान

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे आंबाडेवाडी येथील सुजय गावडे यांच्या घरात आढळून आलेल्या तब्बल ७ फूटी नागाला वनविभागाचे कर्मचारी बबन रेडकर यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. सुजय गावडे यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वन क्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सदरच्या नागाला पकडण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर सुरक्षितपणे त्या नागराजाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा