*वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशनमध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश*
*मुंबई झोनमध्ये संस्था व विद्यार्थी गटात पटकावले विजेतेपद*
कणकवली
महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरच्या वतीने आयोजित ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे २०२६’च्या सेलिब्रेशनमध्ये युवक कल्याण संघ संचलित ‘विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल’ (कणकवली) या संस्थेने नेत्रदीपक दुहेरी यश संपादन केले आहे. या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत महाविद्यालयाने मुंबई झोनमधून इन्स्टिट्यूट कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक (विजेतेपद) पटकावले असून, महाविद्यालयाचा विद्यार्थी विघ्नेश सुरेश घाडी याने ‘रील स्पर्धेत’ मुंबई झोनमधून प्रथम क्रमांक मिळवून ‘विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल’ महाविद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेसाठी इव्हेंट कोऑर्डिनेटर म्हणून प्रा. निशा करंदीकर, प्रा. स्वप्नाली पाटील आणि प्रा. स्नेहल मुळये यांनी विशेष मार्गदर्शन केले. या दुहेरी यशाबद्दल युवक कल्याण संघाचे अध्यक्ष वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे, व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप, उपप्राचार्य डॉ. अमोल उबाळे व विभाग प्रमुख प्रा. अमर कुलकर्णी यांनी विजेता विद्यार्थी विघ्नेश घाडी याच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या यशामुळे कणकवलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उंचावले आहे.
