You are currently viewing जिल्हा विकासाचा रथ कायम ठेवण्यासाठी राणेंना साथ द्या – दीपक केसरकर

जिल्हा विकासाचा रथ कायम ठेवण्यासाठी राणेंना साथ द्या – दीपक केसरकर

जिल्हा विकासाचा रथ कायम ठेवण्यासाठी राणेंना साथ द्या – दीपक केसरकर

वेंगुर्लेतील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

वेंगुर्ले

नारायण राणे यांनी आपल्या खात्याच्या माध्यमातून सिंधुदुर्गात करोडो रुपयांची विकास कामे मार्गी लागली आहेत. यापुढेही हा विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना ९० टक्के मते मिळवून द्या, असे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान जिल्ह्यातील लोकांना प्रथमच नारायण राणे यांना मतदान करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा व्हावा यासाठी प्रचाराला लागा. सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे, असाही दावा केसरकर यांनी केला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्री. राणे यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, ॲड. सुषमा खानोलकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, मुंबई येथून आलेले कुणाल सरमळकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, महिला तालुका संघटक प्राची नाईक, युवक शहर प्रमुख संतोष परब, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, राष्ट्रवादीचे नेते एम. के. गावडे, जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रितेश राऊळ, निलेश सामंत, वंदना किनळेकर, वसंत तांडेल, प्रणव वायंगणकर, बाळा दळवी, पुनम कुबल, योगेश तेली, सुनिल मोरजकर, साईप्रसाद नाईक, कमलेश गावडे, दादा केळुसकर, लक्ष्मीकांत कर्पे, शरद मेस्त्री, पूजा कर्पे, कौशिक परब यांच्या सह तालुक्यातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई आणि मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा