You are currently viewing सिंधुदुर्ग कोल्हापूर जोडणारा मुख्य गगनबावडा घाट रस्त्याच्या नूतनीकरणाबाबत आ. वैभव नाईक यांनी अधिवेशनात विचारला प्रश्न

सिंधुदुर्ग कोल्हापूर जोडणारा मुख्य गगनबावडा घाट रस्त्याच्या नूतनीकरणाबाबत आ. वैभव नाईक यांनी अधिवेशनात विचारला प्रश्न

पावसाच्या अगोदर रस्ता पूर्ण करण्याचे सा.बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभा सभागृहात दिले आश्वासन

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जोडणारा सिंधुदुर्गातील मुख्य रस्ता असलेला गगनबावडा घाट रस्ता नादुरुस्त आहे. या मार्गावरुन प्रवास करताना प्रवाशी व वाहनचालक मेटाकुटीला येत असून सिंधुदुर्ग वासियांची हेळसांड होत असल्याने कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी हा प्रश्न आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला.हा रस्ता नेमका कधी सुरु होईल आणि कधी पर्यंत पूर्ण होईल? अशी विचारणा त्यांनी केली त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पावसाच्या अगोदर रस्ता पूर्ण करण्याचे विधानसभा सभागृहात आश्वासन दिले.
गगनबावडा घाट रस्ता खड्डेमय झाला आहे. पावसात या रस्त्यावरून वाहतूक बंद होती.या रस्त्याला निधी मंजूर असल्याचे सांगण्यात आले मात्र अद्याप पर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. अथवा निविदाहि निघालेली नाही.आता पावसाळ्याला दोन ते तीन महिने शिल्लक आहेत.त्यामुळे गगनबावडा घाट रस्ता नेमका कधी सुरु होईल आणि कधी पर्यंत पूर्ण होईल? आणि पावसात हा घाट रस्ता चालू राहील का?असा प्रश्न आ.वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यावर उत्तर देताना गगनबावडा घाट रस्त्याची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करून पावसाच्या अगोदर रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 8 =