You are currently viewing केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करावेत- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांची मागणी

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करावेत- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांची मागणी

सिंधुदुर्ग

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर 25% ते 35% पर्यंत घसरलेले असताना पेट्रोल व डिझेलचे भाव देशात का कमी होत नाहीत असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी विचारला आहे. जेव्हा पेट्रोल व डिझेलचे भाव वाढतात तेव्हा केंद्र सरकारचे मंत्री पेट्रोल व डिझेलचे भाव सरकारच्या हातात नाहीत आंतरराष्ट्रीय बाजारात होणा-या कच्च्या तेलाच्या भावावर अवलंबून आहेत असे सांगतात तर मग आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा भाव हा 25% ते 35% ने घसरला असताना देशातील पेट्रोल व डिझेलचे भाव कमी होऊन जनतेला त्याचा फायदा का मिळत नाही? कोरोनाच्या काळात सुद्धा कच्च्या तेलाचे भाव अत्यंत कमी झाले होते परंतू त्या काळातही इंधनाचे दर कमी होऊन जनतेला दिलासा मिळाला नाही. केंद सरकार जनतेच्या खिश्यावर दरोडा घालत आहे आणि या दरोड्याच्या पैश्यातून धनदांडग्यांची कर्ज माफी करत आहे. मनमोहनसिंग सरकारच्या काळात 120 डाॅलर प्रति बॅरल असा कच्चा तेलाचा भाव असताना सुद्धा आजच्यापेक्षा 25% ते 30% पेट्रोल व डिझेलचे भाव कमी होते आता 85 डाॅलर प्रति बॅरल पेक्षा ही कमी भाव आंतरराष्ट्रीय बाजारात असताना एवढे महाग पेट्रोल व डिझेल का घ्यावे लागत आहे याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे. आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झालेल्या कच्च्या तेलाच्या भावाचा फायदा जनतेला व्हावा यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव तातडीने 25% ते 30% नी कमी करावेत अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =