You are currently viewing सुकळवाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का ; ग्रा. पं. सदस्य भाजपात

सुकळवाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का ; ग्रा. पं. सदस्य भाजपात

माजी खासदार निलेश राणेंच्या नेतृत्वाने प्रभावित : नरेंद्र पाताडे

मालवण

मालवण तालुक्यातील सुकळवाड ग्रामपंचायतीत शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र सदाशिव पाताडे यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन आपण भाजपा मध्ये दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मालवण येथील भाजपा कार्यालयात हा पक्ष प्रवेश संपन्न झाला. श्री. पाताडे मागील दोन टर्म ग्रामपंचायत सदस्य आहेत. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून आपण निलेश राणे यांचे नेतृत्व मान्य करीत भाजपमध्ये दाखल होत असल्याचे ते म्हणाले. भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, सुकळवाड विभागीय अध्यक्ष चेतन मुसळे, सौरभ ताम्हणकर, निशय पालेकर, संतोष गावकर, दीपक सुर्वे, बाबल मांजरेकर आदिंसह अन्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा