You are currently viewing

कणकवली तालुक्यात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी 

कणकवली तालुक्यातील मौजे- कळसुली मधलीवाडी येथील घर क्र. 340-ब  चा 50 मीअर परिसर व मौजे खारेपाटण संभाजीनगर येथील घर क्र. 921 चा 50 मीटर परिसर  या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने  यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 2 =