You are currently viewing क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवचे प्रशिक्षक आज मालवणात…

क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवचे प्रशिक्षक आज मालवणात…

क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवचे प्रशिक्षक आज मालवणात…

मालवण

भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवचे प्रशिक्षक आणि मालवणचे माजी खेळाडू अशोक आस्वलकर हे उद्या २७ रोजी दुपारी ३.३० वाजता मालवण एज्युकेशन सोसायटीच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथे मालवण तालुक्यामधील क्रिकेट खेळाडूंना विनामूल्य लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यास येत आहेत. तरी सर्व नवोदित खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा. तालुक्यातील कोणताही खेळाडू या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेऊ शकतो. इच्छुक खेळाडूंनी उद्या दुपारी ३.३० वाजता टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथे उपस्थित राहावे. नवोदित खेळाडूंना या सराव शिबिराबद्दल काही शंका असल्यास त्यांनी क्रिकेट प्रशिक्षक संदीप उर्फ मार्शल शिरोडकर यांच्याबरोबर संपर्क साधावा असेआवाहन मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
\

प्रतिक्रिया व्यक्त करा