You are currently viewing दीपावली शो टाईमनिमित्त दोडामार्ग बाजारपेठ वक्रतुंड मित्र मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

दीपावली शो टाईमनिमित्त दोडामार्ग बाजारपेठ वक्रतुंड मित्र मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

दोडामार्ग :

 

दीपावली शो टाईमनिमित्त दोडामार्ग बाजारपेठ वक्रतुंड मित्र मंडळातर्फे दोन दिवस विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. गुरुवार १० नोव्हेंबर रोजी बारा वर्षाखालील फॅन्सी ड्रेस स्पर्धा यासाठी प्रथम पारितोषिक रु. ४००० व चषक, द्वितीय रु.३००० व चषक, तृतीय रु. २००० व चषक, चतुर्थ रु. १००० व चषक, बारा वर्षाखालील लहान गट डान्स स्पर्धा यासाठी प्रथम पारितोषिक रु. ४००० व चषक, द्वितीय रु.३००० व चषक, तृतीय रु. २००० व चषक, चतुर्थ रु. १००० व चषक, शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी बारा वर्षांवरील मोठा गट डान्स स्पर्धा यासाठी प्रथम पारितोषिक रु. ५००० व चषक, द्वितीय पारितोषिक रु. ३००० व चषक, तृतीय पारितोषिक रु. २००० व चषक तसेच उत्तेजनार्थ प्रथम द्वितीय व तृतीय बक्षिसे आहेत. या सर्व स्पर्धा येथील पिंपळेश्वर हॉलमध्ये होणार असून ९ नोव्हेंबरपूर्वी इच्छुक स्पर्धकांनी मनोज पार्सेकर, विशाल चव्हाण, गोकुळदास बोंद्रे यांच्याशी संपर्क साधवा.

प्रतिक्रिया व्यक्त करा