You are currently viewing व्ही. एन. नाबर प्रशालेत क्रांती दिन उत्साहात साजरा…

व्ही. एन. नाबर प्रशालेत क्रांती दिन उत्साहात साजरा…

व्ही. एन. नाबर प्रशालेत क्रांती दिन उत्साहात साजरा…

बांदा

श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचालित येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीती साळगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे विद्यार्थी सार्थक वालावलकर (भगतसिंग), मानस परब (चंद्रशेखर आजाद), अंश परब (सुखदेव), धनेश परब (राजगुरू) यांनी वेशभूषा सादर करून त्यांची कामगिरी व त्यांचे कर्तृत्व सांगितले.
यावेळी प्रशालेच्या सहशिक्षिका प्रतीक्षा शिरोडकर, वेलांकनी रॉड्रिग्ज, तेजस्वी गावडे व प्राची परब उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा