You are currently viewing मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवलीतर्फे 8 मार्च रोजी कार्यक्रम

मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवलीतर्फे 8 मार्च रोजी कार्यक्रम

कणकवली

8 मार्च हा जागतिक महिला दिन, मिळून साऱ्याजणी महिला मंच गेली १९ वर्ष सातत्याने महिलांसाठी आनंदोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे.. यंदाच्या 20 व्या वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे 8 मार्च रोजी दुपारी 2 वाजल्यापासून केले आहे.

या निमित्त दुपारी 2.30ते 3.30,पाककला स्पर्धा. स्पर्धेतील पदार्थ शाकाहारी किंवा मांसाहारी असा कोणताही एकच पदार्थ घरी बनवून आणले. या पदार्थाची सजावट सुद्धा खाण्यायोग्य अशा गोष्टींनी करणे .2)चार्मिंग लेडी स्पर्धा.. ही स्पर्धा फक्त विवाहित महिलांसाठी असून, स्पर्धेत भाग घेणार्‍या महिलांना आधी चार दिवस ट्रेनिंग दिले जाईल, भाग घेणाऱ्या महिलांना वयाची अथवा इतर कोणतीही अट नाही, मात्र अगोदर नोंदणी आवश्यक. 3) समाजासाठी आणि कुटुंबासाठी विशेष असे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार. 4) उद्योगिनी पुरस्काराचे वितरण. 5) महिलांचे विविध गुणदर्शनपर( रेकॉर्ड डान्स, मिमिक्री, एकपात्री अभिनय, कविता, महिलांसाठी संदेश पर भाषण, उस्फूर्त प्रतिसाद याद्वारे सादरीकरण अशा विविध मनोरंजनपर कार्यक्रमांची रेलचेल जागतिक महिला दिन 8 मार्च, बुधवार या दिवशी मातोश्री मंगल कार्यालय,कणकवली येथे दुपारी 2 वाजल्यापासून असणार आहे. फक्त्त महिलांसाठीच असलेल्या मिळून साऱ्याजणी महिला मंचच्या कार्यक्रमांना आपण सर्व महिला भगिनी उपस्थित राहून आमचा उत्साह आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मिळून साऱ्याजणी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा