You are currently viewing वरची गुरामवाडी (कट्टा) ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे धोंडी गोविंद कामतेकर यांची बिनविरोध निवड

वरची गुरामवाडी (कट्टा) ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे धोंडी गोविंद कामतेकर यांची बिनविरोध निवड

मालवण :

 

मालवणातील वरची गुरामवाडी (कट्टा) ग्रामपंचायतीच्या  लढतीत भाजपने एकतर्फी विजय मिळवल्यानंतर गुरुवारी झालेल्या उपसरपंच निवडणुकीत भाजपचे धोंडी गोविंद कामतेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नवनिर्वाचित सरपंच शेखर सदानंद पेणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सरपंच व उपसरपंच यांनी पदभार स्वीकारला.

नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचे जि. प. चे माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, ऋषी पेणकर, सुनील नाईक, सुनील गुराम, शेखर मसुरकर, सागर माळवदे, नंदू वालावलकर, शिवराम गुराम, सुनील रावले, संजय गुराम, सुभाष गिरकर, राजन फाटक, शैलेंद्र शंकरदास, अवधूत डगरे, पिंट्या खटावकर यासह अन्य उपस्थितांनी अभिनंदन केले आहे. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विलास बांदेकर, मयुरी कुबल, प्रशांत टेंबुलकर, विद्या गिरकर, वंदेश ढोलम, संपदा वालावलकर, सुप्रिया गुराम, श्रद्धा गुराम आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा