You are currently viewing बावळाट- दाणोली तिठा येथे उभारण्यात आलेली पोलीस चौकी कायमची बंद करा…

बावळाट- दाणोली तिठा येथे उभारण्यात आलेली पोलीस चौकी कायमची बंद करा…

बावळाट- दाणोली तिठा येथे उभारण्यात आलेली पोलीस चौकी कायमची बंद करा…

अन्यथा 26 जानेवारी रोजी उपोषण:जयंत बरेगार यांचा इशारा…

सावंतवाडी

तालुक्यातील बावळाट दाणोली तिठा या ठिकाणी अनावश्यक रित्या उभारण्यात आलेली पोलीस चौकी कायमची बंद करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार पुन्हा एकदा 26 जानेवारी रोजी उपोषण छेडणार आहेत या उपोषणामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कर्तव्य कसूर केल्याप्रकरणी शासन आदेशाप्रमाणे कारवाई न होणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गतवर्षी केलेल्या उपोषणावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करणे आधी प्रश्नही त्यांनी ठेवले आहेत.

श्री बरेगार यांनी याबाबत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना निवेदन सादर केले आहे असे म्हटले आहे की दाणोली बावळाट तिटा याठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आली आहे मुळात माहितीच्या अधिकारानुसार या ठिकाणी चौकीत अस्तित्वात नसल्याचे पुढे आले आहे. अनधिकृत रित्या उभारण्यात आलेली ही चौकी सामायिक क्षेत्र असलेल्या जागेत उभारण्यात आली आहे याला कोणतीही परवानगी नाही. 2019 पासून आंबोली घाटात 20 टन वरील तसेच दहा चाकी वाहने यांना बंदी असतानाही ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिसांकडून अशा वाहनावर कारवाई होताना दिसत नसल्याचे बरेगार यांनी पोलीस अधीक्षक यांच्या नजरेस आणून देत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे अहवाल मागविण्यात आला होता परंतु या अहवालामध्ये उचित व समर्पक उत्तर देण्यात आले नव्हते. आजही या मार्गावरून बेकायदेशीर दारू वाहतूक कोंबडी वाहतूक गोरे वाहतूक ओव्हरलोड अनधिकृत वाहतूक वाळू चिरे वाहतूक आधी सुरू आहे मुळात सदरची चौकी चुकवण्यासाठी चौकीच्या तीन बाजूने पर्यायी डांबरीकरण केलेले रस्ते ही उपलब्ध आहेत त्याचा वापर अखंडितपणे सुरू आहे त्यामुळे सदरची चौकी ही बिनकामाची ठरलेली आहे त्यामुळे यावर उचित कार्यवाही व्हावी तक्रार अर्जाच्या अनुषंगाने केवळ चौकशीचे फार्स केले जात असल्याने अधिकारी कर्मचारी यांच्यावर धाक निर्माण झालेला नाही तरी येथे कार्यवाही व्हावी असे मागणी केली आहे एकूणच आपल्या विविध प्रश्नावर समाधानकारक कारवाही न झाल्यास कारवाई होईपर्यंत 26 जानेवारी पासून उपोषण छेडणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा