माझी वसुंधरा अभियानात कणकवली नगरपंचायत महाराष्ट्रात अव्वलस्थानी

माझी वसुंधरा अभियानात कणकवली नगरपंचायत महाराष्ट्रात अव्वलस्थानी

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नगर पंचायत कर्मचारी अधिकाऱ्यांचे केले कौतुक

कणकवली

कणकवली नगरपंचायतीने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून माझी वसुंधरा अभियान 2020 – 21 मध्ये महाराष्ट्र राज्यात कणकवली नगरपंचायतने अव्वल स्थान मिळवले आहे. राज्यभरातील 132 नगरपंचायतीनी या अभियानात सहभाग घेतला होता. कणकवली नगरपंचायत 38 व्या क्रमांकावर आपली छाप उमटवली आहे. या अभियानात भूमि, वायू, जल, अग्नी व आकाश या सहा टप्प्यांमध्ये काम करून त्यातील कामाचे मूल्यमापन करण्यात आले होते.

गेल्या वर्षी कोविड काळ असून देखील ज्या नगरपंचायतनी अभियानात उत्कृष्ट काम केले अशा नगर नगरपंचायतींचा गौरव करण्यात आला आहे. यात कणकवली नगरपंचायत ने 38 व्या क्रमांकावर बाजी मारली आहे. पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संवर्धन या अनुषंगाने या अभियानाच्या माध्यमातून काम करण्यात आले होते. यात कणकवली नगरपंचायतने 132 नगरपंचायत मधून 38 व्या क्रमांकावर आपली छाप उमटवली आहे. कणकवली नगरपंचायतने केलेल्या कामाबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधुत तावडे सर्व नगरसेवक यांनी नगरपंचायत कर्मचारी अधिकारी यांचे कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा