You are currently viewing कोल्हापुरातील विजयाचा युवक काँग्रेसकडून मालवणात जल्लोष…

कोल्हापुरातील विजयाचा युवक काँग्रेसकडून मालवणात जल्लोष…

मालवण

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव करत विजयी झेंडा फडकवला. या विजयाचा जल्लोष मालवणात काँग्रेस व युवक काँग्रेसच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. मालवण बसस्थानक समोर फटाके फोडून, पेढे वाटत घोषणाबाजी करण्यात आली.

युवक काॕग्रेसच्यावतीने येथील बस स्टँड येथे गृहमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व कोल्हापूर मधील पहिल्या महिला नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव यांच्या फोटोला पेढा भरवून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा युवक काॕग्रेस प्रवक्ता अरविंद मोंडकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष मेघनाद धुरी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, राष्ट्रवादी जिल्हा सचिव प्रमोद कांडरकर, युवक जिल्हा सचिव योगेश्वर कुर्ले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश कोयंडे, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, मिताली बाबर्डेकर, पराग माणगावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन युवक जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा