You are currently viewing देशातील अंधःकार आणि महाराष्ट्रावरील संकट दूर करेल मशाल – युवा नेते आदित्य ठाकरे

देशातील अंधःकार आणि महाराष्ट्रावरील संकट दूर करेल मशाल – युवा नेते आदित्य ठाकरे

सावंतवाडी :

आम्ही केलेलं मुंबई – गोवा हायवेचं काम पूर्ण झालं पण महायुती सरकारच्या काळात मात्र फक्त भूमी पूजने झाली. विकासात्मक कामासाठी महाविकास आघाडी सरकारची नितांत गरज आहे. भाजप सरकार आता केंद्रातून तडीपार करण्याची आवश्यकता. देशात आता परिवर्तनाची लाट आली आहे.

महाराष्ट्र आणि देशातून आता भाजप हद्दपार होणार आहे. दक्षिण भारतात तर भाजपची स्थिती अत्यंत खराब आहे. उत्तर प्रदेशात तर 50 पण निवडून येणार नाहीत. बिहार आणि आजूबाजूच्या राज्यात देखील अशीच स्थिती आहे.

केवळ फसव्या आश्वासनांनी त्यांनी जनतेला फसवलं आहे.
370 कलम काढल्यावर आम्ही पण आनंद साजरा केला. मात्र पुढे इतर दिलेल्या आश्वासनांचं काय..??? जम्मू काश्मीर आणि लड्डाख मधील लोकांच्या भावनांशी भाजपने भावनिक खेळ केलाय. भाजपा आता कुठूनही जिंकून येणार नाही. हिंदू – मुस्लिम यांच्यात जातीयवाद निर्माण करणे त्यांनी सुरू केलं आहे. महाराष्ट्रात आत्ता महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येणार.

संविधान बदलविण्याची भाषा ते करताहेत. संविधान आणि बाबासाहेब यांच्याबद्दल भाजपला प्रचंड द्वेष आहे.
मोदी हटाव, देश बचाव..!

राणे – केसरकर दोघांची युती फक्त स्वार्थासाठी. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात मध्ये गेले तेव्हा राणे, केसरकर मूग गिळून गप्प होते. मी मात्र भाजपाशी थेट भिडलो. कदाचित यांचं राज्य पुन्हा आलं तर मुंबईचं मंत्रालयदेखील गुजरातला नेतील इतकं भयानक यांचं वागणं आहे. कामाबद्दल बोलण्याची यांची हिम्मत नाही. तरुण बेरोजगार, शेतकऱ्यांवर अन्याय, कष्टकरी जनतेला भाजपने कायमच फसवलं. हे मिंदे, खोके सरकार फक्त जनतेला फसविणारे.

दिल्लीत शेतकऱ्यांवर लाठी चार्ज केला, शेतकऱ्यांवर अश्रूधूर, गोळीबार केला गेलाय त्या भाजप सरकारला आता धडा शिकविण्याची गरज आहे. मिंदे सरकार तुम्ही खोके देऊन धोके दिले. यापुढे जनता तुम्हाला धडा शिकवेल. राज्यातील शासकीय नोकऱ्या बंद केल्या गेल्या. तलाठी भरतीत घोटाळा? तरुण हताश होतोय. स्थानिकांना अजिबात रोजगार नाही.

कर्नाटकात राक्षसी वृत्तीचा रेवन्ना महिलांवर हजारो अत्याचार करतो त्याला भाजप खासदारकीचे तिकीट देते. गुजरातमधील बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना भाजपने जेल मधून बाहेर काढले, अशा अत्याचारी भाजपला तुम्ही मतदान करणार काय.?
भाजपने महागाई वाढवून सामान्यांचं जगणं मुश्किल केलं आहे. आता जनतेच्या मनात प्रचंड राग आहे.

केसरकरांना नांव न घेता टोला..-
ज्यांची लायकी नाही त्यांच नांव घेऊ नका.
४ जूनला महाराष्ट्राची जनता आता तुम्हाला जागा दाखविणार.!

आदित्य ठाकरेंनी व्यासपीठावरून जनतेला प्रश्न विचारला –
“कोकणात चिंधी चोरांना प्रवेश देणार काय?
कोंबडी चोरांना पुन्हा डोक्यावर बसवणार काय?”

अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करून केंद्रातील मोदी सरकारचे वाभाडे काढत युवा नेते आदित्य ठाकरेंनी सभा दणाणून सोडली. आजच्या शिवसेनेच्या जाहीर सभेसाठी गांधी चौक भगवामय झाला होता, शिवसैनिकांची झालेली प्रचंड गर्दी पाहता शिवसेना पुन्हा एकदा ताठ कणा करून उभी राहते आहे असे दिसत होते.

मालवण कुडाळ मतदारसंघाचे आमदार आणि शिवसेनेचा बुलंद आवाज, ढाण्या वाघ अशी उपाधी मिळालेले तरुण तडफदार युवानेते वैभव नाईक यांनी दोडामार्ग येथील पैसे वाटप होत असलेल्या बातमीचा धागा पकडत पैसे वाटणाऱ्यांचा प्रशासनाने बंदोबस्त न केल्यास कायदा हातात घेणार असा इशारा व्यासपीठावरून दिला. सभेला झालेली प्रचंड गर्दी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नक्कीच चुरस निर्माण करेल असे वातावरण करून गेली.

प्रतिक्रिया व्यक्त करा