You are currently viewing सावंतवाडी मनसेची अवैध धंदे व प्रार्थना स्थळांवरील भोंग्या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याशी चर्चा

सावंतवाडी मनसेची अवैध धंदे व प्रार्थना स्थळांवरील भोंग्या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याशी चर्चा

सावंतवाडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावंतवाडी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांची आज भेट घेतली व प्रार्थना स्थळांवरील भोंग्यान संदर्भात व भोंग्याच्या कर्कश आवाजामुळे सावंतवाडी शहरात होणाऱ्या त्रासासंदर्भात चर्चा केली तसेच सावंतवाडी तालुक्यातील चालू असलेल्या अवैद्य धंद्यांबाबत बाबत व युवा पिढी बऱ्याच विविध व्यसनांच्या आड बरबाद होत असल्याचे निदर्शनास येत आहे यासंदर्भात चर्चा करण्यात आली व या सर्व गोष्टींना आळा बसावा यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्याकडे मागणी केली तर तातडीने पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा आवाज तपासण्यात येईल व क्षमतेपेक्षाही मोठ्या प्रमाणात भोंग्यांचा आवाज आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे आश्वासन उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सोळंके यांनी दिला तर अवैद्य धंद्यांबाबतही आपण योग्य कारवाई करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना शब्द दिला तसेच या महत्त्वाच्या विषयासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी मा शहराध्यक्ष तथा विद्यार्थीसेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर संतोष भैरवकर सतीश आकेरकर विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष निलेश देसाई प्रमोद तावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + twelve =