You are currently viewing सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात कुडाळ मनसेचे आत्मक्लेश आंदोलन….

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात कुडाळ मनसेचे आत्मक्लेश आंदोलन….

मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन

सिंधुदुर्गनगरी
पणदूर घोटगे राज्य महामार्ग क्रमांक 179 वर मागील पाच वर्षात जवळपास बारा कोटी रुपये खर्च होऊन सुद्धा रस्त्याची झालेली दयनीय अवस्था व बकाल परिस्थिती याच्या निषेधार्थ मनसेने आज आत्मक्‍लेश आंदोलन पुकारले होते. सदरचा शासन निधी हा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी व कंत्राटदारांना पोसण्यासाठी खर्च केला का? असा सवाल मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना करून चौकशीची मागणी निवेदनाद्वारे केली होती, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेवाळे व उपअभियंता हेवाळे यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अप्रत्यक्षपणे या भ्रष्ट कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचे काम केले. परिणामी पणदूर घोटगे राज्य महामार्गाच्या खड्डेमय अवस्थेमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचे अक्षरश: कंबरडे मोडत आहे. जनतेच्या भावना शासनाकडे पोहचवण्यासाठी व लक्षवेधासाठी मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेश आंदोलन पुकारले होते.
सदर आंदोलनास पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थिती दर्शवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर खराब रस्त्यांच्या विरोधात जाब विचारत प्रश्नांचा भडिमार केला. तसेच उपअभियंता हिवाळे हे ओरोस येथील कार्यालयात उपलब्ध होत नाहीत किंबहुना हजर राहत नाहीत अशा तक्रारी उपस्थित मनसैनिकांनी केल्या. शेवटी निरुत्तर झालेल्या अधिकाऱ्यांनी मनसे शिष्टमंडळासमवेत रस्त्यांची पाहणी करण्याचे सांगितले व आपल्या मागण्या वा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवुन चौकशीचे सांगितले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या मुजोर झालेल्या अधिकाऱ्यांना टू व्हीलर ने प्रवास करण्यास भाग पाडण्याच्या भावना यावेळी मनसैनिकांनी व्यक्त केल्या.
यावेळी मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल कीनळेकर, जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, माजी कुडाळ तालुकाध्यक्ष बाबल गावडे, उपतालुका अध्यक्ष दीपक गावडे, अविनाश अणावकर, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, रामा सावंत, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अक्षय गुरव, गुरू मर्गज आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =