You are currently viewing सिंधुदुर्ग ते हैदराबाद फ्लाय ९१ची विमानसेवा सुरु

सिंधुदुर्ग ते हैदराबाद फ्लाय ९१ची विमानसेवा सुरु

आठवड्यातून तीन वेळा करणार उड्डाण

वेंगुर्ला :

भारतातील विमान कंपनी फ्लाय ९१ ने सिंधुदुर्ग ते हैदराबाद विमान सेवा सुरु केली आहे. हे विमान चिपी (सिंधुदुर्ग) या विमानतळावर आठवड्यातून तीन वेळा उड्डाण करणार आहे. या सेवेमुळे सिंधुदुर्ग आणि तिरुपती (आंध्रप्रदेश) मधील अंतर कमी झाल आहे. तसेच या तीर्थयात्रेला जाणाऱ्या प्रवाशांचा हा लांबलचक प्रवास फ्लाय ९१ने सुख सुविधेने समृद्ध आणि आरामदायी बनवला आहे अशी माहिती फ्लाय९१च्या अधिकाऱ्याने दिली.

सिंधुदुर्ग ते बेंगळुरूपर्यंतच्या फ्लाइट ऑपरेशन्ससह सुरू झालेल्या या विमान सेवेने आता हैदराबादला विमान सेवा सुरु केल्या आहेत आणि पुण्यासारख्या इतर स्थळांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे. भारताच्या एव्हिएशन ग्रिडवर फ्लाय९१च्या चढाईमुळे दक्षिण महाराष्ट्र प्रदेश देखील सुधारित हवाई संपर्कासाठी खुला झाला आहे.

प्रवासी फ्लाय९१ विमान सेवेला निवडून त्यांचा १५ तासांचा सिंधुदुर्ग ते हैदराबादचा (६२४ किमी) बस प्रवास आता १ तास २५ मिनटात करू शकणार यामुळे त्यानंतर तिरुपतीला जाण्यासाठी सुखकर प्रवासाचा होणार आहे.

सध्या, कंपनीकडे दोन एटीआर ७२-६०० ही विमाने आहेत, तसेच कंपनी आणखी चार विमाने लवकरच आणण्याच्या प्रयत्न्यात आहे.

फ्लाय९१ बद्दल माहिती

फ्लाय९१ ही गोव्यातील एक प्रादेशिक विमान कंपनी आहे, ज्याचे लक्ष्य भारतातील लहान शहरांशी हवाई संपर्क सुधारण्याचे आहे. अनुभवी व्यावसायिकांनी स्थापन केलेल्या आणि निधीद्वारे समर्थित, फ्लाय९१ पुढील पाच वर्षांत ५० शहरांना जोडण्याची योजना आखत आहे. ते त्यांच्या ताफ्यात ३० विमाने जोडतील, जी देशभरातील विविध केंद्रांवर असतील. त्यांनी त्यांची सुरक्षा, कार्यक्षमता आणि टिकाऊपणा यासाठी एटीआर ७२-६०० विमाने निवडली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा