You are currently viewing वेंगुर्ला तालुक्यात महायुतीच्या विविध बूथना विशाल परब यांची भेट

वेंगुर्ला तालुक्यात महायुतीच्या विविध बूथना विशाल परब यांची भेट

वेंगुर्ला :

 

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचे खंदे समर्थक भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेंगुर्ला तालुक्यात विविध महायुतीच्या बूथना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून मतदानाचा आढावा घेतला. तसेच महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीने मतदान होईल याकडे लक्ष देण्याची सूचना केली.

यावेळी वेंगुर्ला तालुक्यात विशाल परब त्यांनी कॅम्प गवळी तिठा, भटवाडी, हॉस्पिटल नाका व इतर भागातील बुथाना भेटी दिल्या. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा नियोजन सदस्य दिलीप गिरप, शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे, वृंदा गवंडळकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, जया राऊळ, अमेय धुरी, सुधीर पालयेकर, तुळस माजी सरपंच शंकर घारे, विजय रेडकर, जयवंत तुळसकर, विनय गोरे, तुळस उपसरपंच सचिन नाईक, भानुदास माळकर यांच्यासाहित महायुती पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा