You are currently viewing जिल्ह्यातील मंडप साउंड कॅटरिंग असोसिएशनच्यावतीने लाक्षणिक उपोषण….

जिल्ह्यातील मंडप साउंड कॅटरिंग असोसिएशनच्यावतीने लाक्षणिक उपोषण….

समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी सिंधुदुर्ग उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना लेखी स्वरूपात निवेदन

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा मंडप लाईट साऊंड इव्हेंट केटर्स असोसिएशन ने सिंधुदुर्ग नगरी ओरस येथे मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषण स्थळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सिंधुदुर्ग उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष मा. पुंडलिक दळवी, कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, महिला जिल्हाध्यक्ष सौ. दर्शना बाबर देसाई व याकूब शेख यांनी भेट देऊन या सर्व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व यासंबंधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार तसेच जलसंपदा मंत्री जयंत दादा पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे सर्व व्यापारी बंधूंना आश्वासन दिले. तसेच मा. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या सोबत कायम असेल असे आश्वासित केले. यावेळी माननीय मंत्री महोदय यांसोबत चर्चा करण्यासाठी आज रोजी मुंबईत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
वरील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मंडप लाईट इव्हेंट्स साऊंड केटरर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी पुंडलिक दळवी यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 10 =