You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात महाराष्ट्र विवेकवाहिनी उपक्रमाचे उद्घाटन संपन्न

वैभववाडी महाविद्यालयात महाराष्ट्र विवेकवाहिनी उपक्रमाचे उद्घाटन संपन्न

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये ‘महाराष्ट्र विवेक वाहिनी’ या विस्तारकार्य उपक्रमाचा उद्घाटन समारंभ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.एम.कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक प्रा. श्री. एस. एन. पाटील, प्रा.डॉ.बी.डी. इंगवले, महाराष्ट्र विवेक वाहिनी विभाग प्रमुख प्रा.संजीवनी पाटील व सदस्य प्रा.डॉ.आर.एम.गुलदे उपस्थित होते.


महाराष्ट्र विवेकवाहिनी हा महाविद्यालय पातळीवरील एक विस्तारकार्य उपक्रम आहे. महाराष्ट्र शासन,विद्यापीठ आणि शिक्षण तज्ञांनी मान्य केलेला उपक्रम असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीवा व दृष्टिकोन विकसित करण्याचे कार्य करतो. सन २००५ पासून हा उपक्रम महाविद्यालयात सुरू आहे.
विवेक वाहिनीच्या विद्यार्थी सभासदांनी दररोज अर्धा तास अभ्यासेत्तर वाचन, दररोज व्यायाम करणे, निर्व्यसनी राहणे व वर्षातून किमान एक खादी कापड खरेदी करणे अपेक्षित आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उच्च शिक्षणाचे ध्येय साध्य होण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले.


विवेक वाहिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विचार व दृष्टिकोन देऊन जागरूक नागरिक घडवण्याचे कार्य केले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी विवेक वाहिनीमध्ये सहभागी झाले पाहिजे असे प्रा. डॉ.आर.एम.गुलदे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार केला पाहिजे आणि निर्णय घेतला पाहिजे.
प्रत्येक घटनेमागे कारण असते. कारणाशिवाय काहीही घडत नसते. अज्ञानाचा गैरफायदा घेऊन लोकांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषणाची अनेक उदाहरणे देऊन प्रा.डॉ. इंगवले यांनी मार्गदर्शन केले.
विवेक वाहिनी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डोळस बनवण्याचे कार्य केले जाते. विवेकबुद्धी जागृत ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. थोर साधुसंतानी सांगितलेल्या विचारांचा वारसा आज विवेक वाहिनीच्या माध्यमातून पुढे चालविला जात आहे. विवेक वाहिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्व विकास घडवावा असे अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा.ए.एम. कांबळे यांनी सांगितले.


या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विभाग प्रमुख प्रा. संजीवनी पाटील यांनी केले तर प्रा.डॉ.आर‌.एम.गुलदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 9 =