You are currently viewing राणेंना शहरातून लीड मिळवून देणार – समीर नलावडे 

राणेंना शहरातून लीड मिळवून देणार – समीर नलावडे 

राणेंना शहरातून लीड मिळवून देणार – समीर नलावडे

कणकवली

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना कणकवली शहरातून मोठे मताधिक्य देणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

शहरात राणेंचा प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. शहर भाजपतर्फे शनिवारी शहरात राणेंच्या प्रचारार्थ रॅली काढली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पत्रके वाटून राणेंना मतदान करा, असे आवाहन शहवासीयांना केले. कणकवली बाजारपेठ ते आप्पासाहेब पटवर्धन चौकापर्यंत कार्यकर्त्यांनी घरोघरी, दुकानांमध्ये जाऊन राणेंचा प्रचार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राजश्री धुमाळे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे, कझ्युंमर सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे, पंकज पेडणेकर, निखिल आचरेकर, राज नलावडे, राजा पाटकर यंच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा