You are currently viewing मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला तात्काळ डॉक्टर दया – उपसरपंच हेमंत मराठे

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला तात्काळ डॉक्टर दया – उपसरपंच हेमंत मराठे

सावंतवाडी:

 

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला तात्काळ डॉक्टर दया अन्यथा केंद्रालाच टाळे ठोकू असा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी आरोग्य प्रशासनाला दिला आहे.

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. त्यातील एका वैद्यकीय अधिकारी डॉ ठाकूर ह्या प्रसूती रजेवर जात असून दुसऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ जोशी ह्या पुढील शिक्षणासाठी जात असल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.यामुळे दोन्ही वैद्यकीय पदे रिक्त झाली आहेत.याठिकाणी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अन्यथा आरोग्य केंद्र गावात असून आरोग्य सेवा मिळणार नसेल तर प्रसंगी आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकावे लागेल असा इशारा मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे. यापूर्वी आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी नेमणूक देतो असे लेखी देऊन अद्याप कार्यवाही केलेली नाही यामुळे ही भूमिका घ्यावी लागणार असल्याचे मराठे यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा