You are currently viewing दत्तात्रय वारे गुरुजींचे निलंबन रद्द

दत्तात्रय वारे गुरुजींचे निलंबन रद्द

राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या मागणीला व पाठपुराव्याला यश

26 डिसेंबर 20 21 रोजी पुणे येथे राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची राज्य कार्यकारिणीची सभा संपन्न झाली . त्यावेळी पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करणारे वाबळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक , उपक्रमशील आणि राज्यातील सर्व शिक्षकांना प्रेरणादायक काम करणारे आपल्या कामाने संपूर्ण देशभर तसेच महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आदर्श असणारे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणातील अध्ययन अनुभव देताना विद्यार्थ्यांच्या कलाने अध्ययन प्रक्रिया चालावी यासाठी बिन भिंतीची शाळा निर्माण करणारे दत्तात्रय वारे यांच्यावर पुणे जिल्हा परिषदेने निलंबन करण्याची कार्यवाही केलेली होती . त्यावेळी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सभेमध्ये दत्तात्रय वारे गुरुजी यांना निमंत्रित करून त्यांची व्यथा राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकाच्या नेतृत्व मंडळीने ऐकून घेतली आणि त्यावेळा त्यांना शिक्षकांच्या वतीने प्रथमच दिलासा देण्याचे काम ‘ त्यांना प्रेरणा देण्याचे काम त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे काम राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी केले .त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा त्यांच्या या कठीण प्रसंगाच्या कालावधीमध्ये आपल्या सोबत असल्याचे वचन दिले . राज्य कार्यकारणी सभेमध्ये पारित झालेल्या ठरावानुसार 25 जानेवारी 20 22 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये माननीय जिल्हाधिकारी यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री महोदय ‘ व शिक्षण मंत्री महाराष्ट्र यांना वारे गुरुजींचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात निवेदन देण्याचे ठरले होते . त्याचप्रमाणे 27 डिसेंबर 20 21 रोजी प्रत्यक्ष राज्य संघटनेचे पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक महाराष्ट्र प्राथमिक यांची भेट घेऊन निवेदन देऊन वारे गुरुजींचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात राज्य संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आलेली होती .एकंदरीत वारे गुरुजींना न्याय मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे सदस्य एकवटले आणि 25 जानेवारी 2022 रोजी एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेमध्ये निवेदने दिली गेली .त्याचा प्रभाव निश्चितच वारे गुरुजींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी ठरलेला आहे .वारे गुरुजींच्या समर्थनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकवटले आणि या केलेल्या एकीच्या बळावर प्रशासनाने नमते घेऊन अखेर वारे गुरुजींचे निलंबन १ फेब्रुवारी 2022 रोजी मागे घेतल्याचे जाहीर केले .आणि दत्तात्रय वारे गुरुजी यांचेसाठी दिलासादायक घटना घडली . त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचे फळ मिळाले . वारे गुरुजींचं निलंबन मागे घेण्यासंदर्भात सतत पाठपुरावा राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष -सुभाष जिरवणकर , राज्य कार्याध्यक्ष – दशरथ शिंगारे , राज्य सरचिटणीस – अनंता जाधव ,राज्य कोषाध्यक्ष – पाकिजा पटेल ,उपाध्यक्ष – संभाजी ठुबे , सहसचिव माधव वायचाळ ,शिवराज सावंत ,बाजीराव शिंदे , सुनिल गुरव , पांडूरंग गिरी व राज्य कार्यकारणी सदस्य यांनी केला. तसेच सर्व जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य यांनी सुद्धा वारे गुरुजींचे निलंबन मागे घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ,शिक्षण मंत्री यांना निवेदने दिली . सर्वप्रथम राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेने वारे गुरुजीं वर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य , विभाग व जिल्हा पदाधिकारी प्रयत्न यांनी केलेले आहे . राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य , विभाग , जिल्हा पदाधिकारी यांनी केलेला सततचा पाठपुरावा यामुळे माझेवरील निलंबनाचा लागलेला डाग लवकर पुसण्यास मदत झाली त्यामुळे या संघटणेचे मी आभार मानणार नाही तर कायम ऋणात राहून यापुढे शैक्षणिक काम यापेक्षा जास्त समाज भिमुख करण्यासाठी कार्यरत राहीन . व माझ्या संघटनेसाठी निश्चितच वेळ देईन . राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर व राज्यकार्याध्यक्ष -दशरथ शिंगारे यांनी सतत संपर्कात राहून आधार दिले बद्दल स्वतः चे व कुटुंबियांचे वतीने आनंदोदगार काढले . त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कार्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच लाभदायक ठरेल असा आशावाद निर्माण झालेला आहे .

दत्तात्रय वारे गुरुजींचे निलंबन मागे घेण्यासाठी राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने शिक्षण आयुक्त  महाराष्ट्र यांना निवेदन देताना राज्याध्यक्ष -सुभाष जिरवणकर, राज्यकार्याध्यक्ष -दशरथ शिंगारे राज्यसरचिटणीस – अनंता जाधव ,राज्यप्रवक्ता – सुनिल गुरव , सहसचिव -माधव  वायचाळ व हिंगोली सचिव पांडुरंग गिरी .आधी शिष्टमंडळामध्ये उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 3 =