विद्यार्थी व पालक यांच्यासाठी २० जूनला ऑनलाईन वेबिनार

विद्यार्थी व पालक यांच्यासाठी २० जूनला ऑनलाईन वेबिनार

मालवण

मालवण तालुका बौद्ध सेवा समिती, मुंबई व मूलखी शाखा यांच्यावतीने विद्यार्थी व पालक यांच्यासाठी ऑनलाईन वेबिनार रविवार दि. २० जून रोजी सायंकाळी ७ वाजता गुगल मीट व युट्युब चॅनलवर प्रसारित होणार आहे.

या उपक्रमांतर्गत लॉकडाऊन काळात अभ्यासाचे नियोजन या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान आर. पी. बागवे हायस्कुल मसुरेचे शिक्षक किशोर चव्हाण करणार आहेत.

यासाठी https://youtu.be/JcN7gXf9uo0 या लिंकवर संपर्क साधावा या उपक्रमाचा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व पालक यांनी घ्यावा, असे आवाहन मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मुंबई व मूलखी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा