You are currently viewing राष्ट्रीय संपर्क प्रमुख पदी: शाहीर मनोहर पवार

राष्ट्रीय संपर्क प्रमुख पदी: शाहीर मनोहर पवार

बुलडाणा :(बबनराव आराख)

शिवचरण फाउंडेशन मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. महाराष्ट्र यांची राष्ट्रीय कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवचरण उज्जैनकर यांनी सदर कार्यकारणी, एका झूम मीटिंग द्वारे जाहीर श करण्यात आली. कार्यकारणी मध्ये महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील , साहित्यिक प्रतिभावंत, लेखक, कलावंत विविध पदावरील सन्माननीय व्यक्तींची या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र सह बेळगाव कर्नाटका मुंबई, गोवा, गुजरात तेलंगणा, इतर राज्यातील अनेक व्यक्तीची ठिकाणी निवड करण्यात आली असून,, त्यांना या राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये सामील करण्यात आले. त्या मध्ये केळवद तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथील प्रख्यात शाहीर, कवी लेखक साहित्यिक मनोहर पवार यांची राष्ट्रीय संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली. साहित्यिक कवी लेखक , पवार यांना यापूर्वी अनेक साहित्यातील तथा विविध सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोळा वर्षाच्या प्रदीर्घ काळापासून या उज्जेनकर फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सामाजिक न्याय सलोखा आरोग्य कृषी वाचन संस्कृती साहित्य कला कवी संमेलन, राष्ट्रीय साहित्य संमेलने, वृक्षारोपण उपक्रम या संस्थेने राबविले असून साहित्य कला आरोग्य कृषी या सर्व विषयाला अनुसरून कार्य फाउंडेशनने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तथा महाराष्ट्र बाहेर कार्य केले आहे. या पूजन कर फाउंडेशन मध्ये नावलौकिक असलेले प्रतिभावंत साहित्यिक आणि विविध क्षेत्रातील उच्चभ्रू प्रतिष्ठित व्यक्तींचा यामध्ये समावेश असून संस्थेचे अध्यक्ष संस्थापक माननीय डॉक्टर शिवचरण उज्जैनकर यांना टोंगो विद्यापीठ दक्षिन अफ्रिका व्दारे मानस डिग्रीने सन्मानित करण्यात आले आहे. आळंदी येथील साहित्य संमेलनाची लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. सदर राष्ट्रीय कारणी कारणीमध्ये माझा समावेश मा . शिवचरण उज्जैनकर सरांनी केला याबद्दल मला अभिमान आहे. असे या वेळेस श्री पवार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा