You are currently viewing कुडाळ पंचायत समितीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शासकीय जयंती साजरी

कुडाळ पंचायत समितीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शासकीय जयंती साजरी

कुडाळ

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शासकीय जयंती कुडाळ पंचायत समिती सभागृहात साजरी करण्यात आली.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी जि. प. सदस्य अमरसेन सावंत,कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती जयभारत पालव, पंचायत समिती सदस्य श्रेया परब, मथुरा राऊळ, संजय भोगटे, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप,गंगाराम सडवेलकर जीवन बांदेकर, स्नेहा दळवी, व पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 6 =