You are currently viewing दोडामार्ग जुनियर कॉलेजची तालुक्यात बाजी

दोडामार्ग जुनियर कॉलेजची तालुक्यात बाजी

दोडामार्ग :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजने दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 97.24% निकाल लावत बाजी मारली आहे. या कॉलेजचा विज्ञान व वाणिज्य शाखेचा 100% तर कला शाखेचा निकाल 92.59% लागला आहे. मुख्याध्यापक शैलेश नाईक यांच्या कुशल नेतृत्वाखाली कॉलेजच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या मेहनतीचे पालक वर्गातून विशेष कौतुक होत आहे.

या काॅॅलेजचे शाखानिहाय प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे.
वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक कुमारी प्राची प्रमोद गेटवे (87.33%) तालुक्यात प्रथम व्दितीय क्रमांक कुमारी साक्षी गणेश पांचाळ (76.67%)

तृतीय क्रमांक कुमारी साक्षी रामकृष्ण गवस (75.50%)
विज्ञान शाखा
प्रथम क्रमांक – कुमारी मानविका दशरथ राजगोळकर (80.16%) विज्ञान शाखेतून तालुक्यात प्रथम, व्दितीय क्रमांक- कुमारी खुशबू देवराम भाटी (80.00%) विज्ञान शाखेतून तालुक्यात द्वितीय ,
तृतीय क्रमांक- कुमारी नुपूर अविनाश भुजबळ (79.83% )विज्ञान शाखेतून तालुक्यात तृतीय.
कला शाखेचा निकाल पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक- मानसी अशोक गवस (73.50 %),
व्दितीय क्रमांक- कुमार विपुलराज विष्णू पारकर (57.00%),
तृतीय क्रमांक- कु. समृद्धी चंद्रकांत गवस (56.83%).
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक विकासभाई सावंत, खजिनदार सिरीयल नाईक, सचिव विनायक सर मुख्याध्यापक शैलेश नाईक यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 3 =