You are currently viewing मैत्री संस्थेची राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा संपन्न

मैत्री संस्थेची राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा संपन्न

*मैत्री संस्थेची राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा संपन्न*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मुंबई सर्वोदय मंडळ, गांधी बुक सेंटर, नाना चौक, ग्रँटरोड, मुंबई येथे मैत्री संस्थेने आयोजित केलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा गौरवशाली अमृत महोत्सव आणि डॉ. जी. जी. परिख यांच्या ९९व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्य’ विषयावर खुली राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून प्रसिद्ध साहित्यिका फरझाना इक्बाल डांगे, सोशालिस्ट पार्टी मुंबई अध्यक्ष गौतम सोनी, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला, संविधान हक्क परिषदेचे निमंत्रक विशाल हिवाळे, प्रसिद्ध कामगार कवी मकरंद वांगणेकर आणि मैत्री संस्थेचे अध्यक्ष सूरज भोईर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन शाहिर दत्ताराम म्हात्रे यांच्या दमदार पोवाड्याने झाले. त्यांनी वसंत बापटांचा पोवाडा सादर केला आणि सभागृहातील मान्यवरांसह साहित्यिक आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. वयोमानामुळे तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे सभागृहात उपस्थित न रहाता आल्यामुळे डॉक्टर परिख यांनी उपस्थितांना दूरध्वनीद्वारे संबोधित करताना स्पर्धकांना सादरीकरणासाठी तसेच आयोजकांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजक व मैत्री संस्थेचे अध्यक्ष सूरज  भोईर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. सदर स्पर्धेत राज्यभरातून १२१ स्पर्धकांनी आपल्या कविता व्हॉट्सअॅपद्वारे पाठवून सहभाग नोंदवला होता. परंतु अंतिम फेरीच्या सादरीकरणासाठी केवळ ३० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. २०तल्या तरूणापासून ते ७५ पार ज्येष्ठ श्रेष्ठ सारस्वतांनी आपला सहभाग नोंदवला होता.

सदर स्पर्धेसाठी भूषण सहदेव तांबे-मुंबई, चिंतामणी पावसे-ठाणे, कल्पना म्हापुसकर-ठाणे, अंकुश नथुराम जाधव-निवी रोहा, सुचित्रा कुंचमवार-नवी मुंबई, शोभा कोठावदे-मुंबई, राजश्री विरुळकर-वर्धा, प्रफुल अनंत साने-डोंबिवली, विकास पाटील-डोंबिवली, संजय विष्णू जाधव-ठाणे, सरोज गाजरे-ठाणे, किशोरी पाटील-विरार, डॉ. संतोष शिवाजी कांबळे-मुंबई, राजेंद्र मधुकर सावंत-ठाणे, मनमोहन रोगे-ठाणे, शिल्पा शेडगे-मुंबई, लक्ष्मी दिलीप जाधव-मुंबई, प्रदीप कासुर्डे-नवी मुंबई, स्नेहा संजय फदाले-मुंबई, महेश अविनाश नाडकर्णी-मुंबई, संतोष होरंबे-मुंबई, प्रणय प्रकाश सुर्वे-मुंबई, प्रदीप बडदे-नवी मुंबई, स्वाती शिवशरण-नवी मुंबई ह्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून सारस्वतांनी अंतिम सादरीकरणासाठी आपली उपस्थिती नोंदवली. सर्वांनी आपल्या स्वातंत्र्याच्या भावना अगदी नेमकेपणाने मांडताना थेट सरकारला आणि समाजाला प्रश्न विचारले. सदर स्पर्धचे परीक्षण सुप्रसिद्ध साहित्यिका प्रमोदिनी देशमुख आणि वैभवी गावडे यांनी योग्यप्रकारे केले. त्यांनी कोणते निकष लावले आणि कोणत्या कवीच्या कोणत्या कवितेत काय चांगलं होतं हेही त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं.

*राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा-२०२३ चे विजेते*

प्रथम क्रमांक स्नेहा संजय फदाले रोख रुपये १०००/- सन्मानपत्र सन्मानचिन्ह आणि पुस्तक भेट, द्वितीय क्रमांक चिंतामणी पावसे रोख रुपये ७००/- सन्मानपत्र सन्मानचिन्ह आणि पुस्तक भेट, तृतीय क्रमांक प्रदीप कासुर्डे रोख रुपये ५००/- सन्मानपत्र सन्मानचिन्ह आणि पुस्तक भेट उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच अंतिम फेरीतील सर्व सादरकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मैत्री संस्थेचे कला विभाग प्रमुख, मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक तसेच प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. माध्यम प्रायोजक म्हणून दैनिक मुंबई मित्र आणि विशाल महाराष्ट्र यांचे बहुमूल्य योगदान लाभले. शाहिर दत्ताराम म्हात्रे यांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अश्विनी निवाते, विनायक जावळेकर, अमेय भोसले, विजय केदासे, धर्मेश नागोटकर, संतोष भोईर यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + eighteen =