You are currently viewing १५ व १६ मे रोजी अण्णा राऊळ महाराज यांची द्वितीय पुण्यतिथी

१५ व १६ मे रोजी अण्णा राऊळ महाराज यांची द्वितीय पुण्यतिथी

कुडाळ:

 

पिंगुळी येथील अण्णा राऊळ महाराज यांचा द्वितीय पुण्यतिथी कार्यक्रम उत्सव सोमवारी (ता. १५) व मंगळवार (ता. १६) या कालावधीत आयोजित केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत.सोमवारी पहाटे ५.३० वाजता काकड आरती, दुपारी १२ वाजता श्रींची आरती, १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित निमंत्रित वारकरी दिंडी भजन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी ११ हजार १६, ९ हजार १६, ७ हजार १६ रुपये अशी प्रथम तीन, उत्कृष्ट पखवाज १३००, उत्कृष्ट गायक १३००, आकर्षक दिंडी देखावा २ हजार ५१६ रुपये, सन्मानचिन्ह आणि सहभाग प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

सायंकाळी ६.३० ते ७ सांज आरती, मंगळवारी (मुख्य दिवस) पहाटे ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ६ वाजता श्री राऊळ महाराज समाधी स्थानी अभिषेक व सार्वजनिक गार्‍हाणे, ६.३० वाजता श्रध्दा खामकर कृत अण्णा राऊळ महाराज यांच्या एकाध्यायी चरित्रामृत व डॉ. सुजाता पाटील कृत सद्गुरू समर्थ श्री अण्णा महाराज लीलामृताचे सामुदायिक पारायण, १० वाजता श्री विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी आणि राणी जानकीबाई वैद्यकीय संस्था सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी एमडी मेडिसीन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दिगंबर नाईक, बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद खानोलकर, जनरल फिजिशिअन डॉ. कुश प्रसाद, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. विशाल पाटील, मधुमेह, हृदयरोग्य तज्ज्ञ डॉ. नंदादीप चोडणकर, जनरल सर्जन डॉ. गुरुप्रसाद सावदत्ती, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. विनायक लेले, पंचकर्मतज्ज्ञ डॉ. दीप्ती करंगुटकर, जनरल फिजिशिअन डॉ. ललित विठलाणी यांच्या उपस्थितीत हे शिबिर होणार आहे. सकाळी १० वाजता श्री विनायक (अण्णा) महाराज भक्त मंडळ, मुंबई यांचे भजन, दुपारी १२.३० वाजता श्री राऊळ महाराज समाधी स्थानी श्रींची आरती, दुपारी १ ते रात्री १२ अखंड महाप्रसाद, दुपारी १.३० वाजता राऊळ महाराज भक्त मंडळ, आजरा पंचक्रोशी (कोल्हापूर, सुभाष नलावडे) यांच्या दिंडीचे आगमन, दुपारी १ ते २.३० श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ कासार्डे (बुवा प्रकाश पारकर) यांचे भजन, २.३० वाजता शांतादुर्गा बालभजनी सांस्कृतिक मंडळ, विर्डी साखळी-गोवा यांचे भजन, सायंकाळी ४.३० वाजता राऊळ महाराज भक्त मंडळ आजरा पंचक्रोशी यांचे भजन, सायंकाळी ४.३० वाजता मृदुंग वादन, जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार महेश सावंत (कुडाळ आंदुर्ले) यांचे १५१ कलाकारांचा ”पखवाज भजनारंग आणि तांडव” हा अनोखा स्वर व ताल प्रवासासोबत ”ढोलकी भुलली मृदुंगाला, सवे घेऊया तबल्याला” ही संगीत जुगलबंदी होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता श्री प. पू. राऊळ महाराज समाधीस्थानी सांज आरती, रात्री ७.३० वाजता श्रींची पालखी मिरवणुक, आई माऊली ढोल पथक चेंदवण यांचा कार्यक्रम, रात्री १० वाजता पारंपरिक शिमगोत्सव (सहभाग-नेरुर येथील आना मेस्त्री ग्रुप, दिनू मेस्त्री ग्रुप, बाबा मेस्त्री ग्रुप, विलास मेस्त्री ग्रुप) कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन चॅनेलद्वारे दाखविले जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरिटेबल स्ट्रट व श्री राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, पिंगुळी यांच्या वतीने केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा