You are currently viewing एसटी प्रशासनाने चालक व वाहक यांचा पगार लवकरात लवकर द्यावा – जेडी नाडकर्णी

एसटी प्रशासनाने चालक व वाहक यांचा पगार लवकरात लवकर द्यावा – जेडी नाडकर्णी

परिवहन खात्याने अजून पर्यंत कामगारांचे वेतन अदा केलेले नसून ते लवकरात लवकर जमा करावे तसेच सर्वात आधी चालक व वाहक यांचा पगार तात्काळ द्यावा.
आतापर्यंत करोना च्या काळामध्ये असे निदर्शनास आले आहे की,  एसटी गाड्या सुरू झाल्यानंतरच प्रशासनाकडे पैसे जमा होतात व ते चालक व वाहक त्यांच्या कामामुळेच झाले आहे.
अशा परिस्थितीमध्ये चालक व वाहकांना या बिकट परिस्थितीमध्ये योग्य वेळीच पगार देऊन त्यांची मानसिकता वाढवणे गरजेचे आहे. पुढील महिन्यात गणेश चतुर्थी येत असून एसटी महामंडळाने याआधीच संपूर्ण आगाऊ बुकिंग चे पैसे प्रवाशांकडून घेतलेले आहेत व ते जवळजवळ चार महिने स्वतःकडे बाळगून आहेत त्या पैशातून व मिळणाऱ्या व्याजातून एसटी प्रशासनाने चालक व वाहक यांचा पगार अदा करावा असे नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =