You are currently viewing आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्व इंद्रधनुष्याप्रमाणे विविध रंगांनी भरलेले – मधु मंगेश कर्णिक

आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्व इंद्रधनुष्याप्रमाणे विविध रंगांनी भरलेले – मधु मंगेश कर्णिक

*आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्व इंद्रधनुष्याप्रमाणे विविध रंगांनी भरलेले – मधु मंगेश कर्णिक*

*मधु मंगेश कर्णिक यांना आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्व हे इंद्रधनुष्याप्रमाणे विविध रंगांनी भरलेले होते, त्यांनी सर्व क्षेत्रांना स्पर्श केला आणि त्याचे सोने केले. त्यांच्यासारखी विशाल आणि उत्तुंग व्यक्ती पुढील १० हजार वर्षात होणार नाही, असे विचार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आचार्य अत्रे पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केले. त्याचबरोबर मुंबईत मराठी भाषा भवन उभे रहावे आणि त्याला आचार्य अत्रे मराठी भाषा भवन असे नाव द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आचार्य अत्रे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती सोहळा त्यांचे नातू राजेंद्र पै यांच्या पुढाकाराने माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते मधु मंगेश कर्णिक यांना आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मधुकर भावे यांनी आचार्य अत्रे यांचे विविध पैलू उलगडले. मराठा दैनिकाच्या प्रत्येक मथळ्यामध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची ताकद होती, तसेच अत्रे नसते तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच नसता, शिवाय मुंबई ऐवजी महाराष्ट्र नाव हे राज्याला मिळाले नसते, असेही सांगितले. येणाऱ्या काळात आचार्य अत्रे पुरस्कार देता येईल, अशी व्यक्तिमत्वे घडतील की नाही, याची आपल्याला चिंता असल्याचेही ते म्हणाले.
माजी राज्यपाल राम नाईक यांनी हिमालयाची उंची असलेले आचार्य अत्रे यांनी एका आयुष्यात कितीतरी कार्य केले, याचा आढावा घेतला. साहित्य आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात आचार्य अत्रे यांनी दाखवलेले अचाट आणि अफाट कर्तृत्व आजही आपल्याला वंदनीय वाटते. महाराष्ट्र शासनाने आजपासून वर्षभऱ आचार्य अत्रे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष साजरे करावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. नरेंद्र जाधव तसेच गौतम ठाकूर यांनी आपल्या समयोचित भाषणात आचार्य अत्रे यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पै यांनी केले. विक्रम पै, हर्षवर्धन देशपांडे, शिरीष पै यांच्या सूनबाई बीना पै, आचार्य अत्रे यांचे पणतू अक्षय पै तसेच अत्रे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते. आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्वाचा संगीतमय आढावा घेणारा अत्रे-अत्रे-सर्वत्रे हा कार्यक्रम अशोक हांडे यांनी सादर केला. त्याला रसिकांची उत्सफूर्त दाद मिळाली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा