You are currently viewing आगामी काळात मच्छिमारांच्या सर्व प्रश्नांना न्याय देणार….

आगामी काळात मच्छिमारांच्या सर्व प्रश्नांना न्याय देणार….

भाटी येथे आयोजित चर्चासत्रात मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे प्रतिपादन

मालाड

आगामी काळात मच्छिमार बांधवांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून मच्छिमार समाजातील तरूण या व्यवसायात टिकून रहावेत यासाठी शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री ना. अस्लम शेख यांनी मंगळवारी दिली. भाटी येथील भाटी मच्छिमार सर्वोदय सोसायटीच्या सभागृहात मच्छिमार बांधवांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात ना. अस्लम शेख बोलत होते.

यावेळी मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, मढ, वेसावा व मुंबई शहर येथील ३० पेक्षा जास्त मच्छिमार संस्थांचे ८०० प्रतिनिधी या चर्चासत्राला उपस्थित होते. उपस्थित मच्छिमार संस्थांच्या प्रतिनिधींना क्रमाक्रमाने भेटून ना. अस्लम शेख यांनी त्यांच्या समस्या समजून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

राज्याच्या एकूण मत्स्योत्पादनात वाढ करणं हे राज्यशासनाचं उद्दीष्ट असून सागरी मासेमारी बरोबरच भूजल मासेमारीवर भर देण्याचे व आधुनिक तंत्रज्ञान व योग्य ते प्रशिक्षण घेऊन कमीत-कमी जागेमध्ये जास्तीत-जास्त मत्स्योत्पादन करण्याचे आवाहन ना. शेख यांनी मच्छीमारांना केले.

यावेळी मच्छीमार नेते धनाजी कोळी, डाॅ.नेक्सन नाटके, लिओ कोलासो, संतोष कोळी, डॉ.गजेंद्र भानजी, जोजफ कोलासो, रॉनी केणी मच्छिमार संस्थांचे प्रतिनिधी व प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − six =