You are currently viewing चिपळूण पुरग्रस्थाना मनसे सिंधुदुर्ग कडून मदत रवाना

चिपळूण पुरग्रस्थाना मनसे सिंधुदुर्ग कडून मदत रवाना

जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा पुढाकार.

कोकणात ओढवलेल्या ढगफुटी अतिृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थती मध्ये चिपळूण,महाड जवळील गावांमध्ये मोठ्या प्रमाणा वर पाणी आले,बाजारपेठा पाण्याखाली गेल्या.तेथील लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले,कुटुंब उद्ध्वस्त झाली,सन्मा.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना पत्र लिहून आदेश दिला होता की पुरग्रस्थाना जमेल तेवढी मदत करा आणि महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या प्रमाणात मदत सुरू केली.सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेल्या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर मदत जमवून काल सायंकाळी कुडाळ येथून श्री बनी नाडकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मदतीचा ट्रक चिपळूणच्या दिशेने रवाना केला.


जवळपास ५०० कुटुंबांना पुरेल एवढी कडधान्ये व जीवनावश्यक वस्तूंची मदत या मध्ये सामाविष्ट आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब,हेमंत जाधव,गणेश वाईरकर,सुबोध परब, प्रथमेश धुरी, आकाश नाईक,सिद्धांत बांदेकर,समीर वाळके,सागर सावंत,जगन्नाथ गावडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 7 =