You are currently viewing ‘तिमिरातुनी तेजाकडे’ अंध, दिव्यांग गायकांच्या भारतातील पहिल्या संगीत अलबमचे प्रकाशन!

‘तिमिरातुनी तेजाकडे’ अंध, दिव्यांग गायकांच्या भारतातील पहिल्या संगीत अलबमचे प्रकाशन!

*सर्व रसिक, कवी साहित्यिक,व्हॉटसअप ग्रुप मंडळींना आग्रहाचे निमंत्रण*

 

मुंबई :

*’तिमिरातुनी तेजाकडे!’* या अंध दिव्यांग गायकांनी गायलेल्या भारतातील पहिल्या संगीत अलबमचे प्रकाशन आणि प्रसारण सोहळा दिनांक १ मे रोजी सायं.७.३० वाजता दादर मुंबई येथील श्री. शिवाजी मंदिर येथे होणार आहे. या सोहळ्यात अंध, दिव्यांग गायक या अलबममधील गीतांचे सादरीकरण करणार आहेत.
१९८६ साली भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली ‘स्वरकुल चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था मागील ३८ वर्षांपासून सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक, संगीतकार श्री. त्यागराज खाडिलकर हे अनेक वर्षे अंध, दिव्यांग व्यक्तिंना भारतीय संगीत व गायनाचे विनामूल्य प्रशिक्षण देत आहेत.

या अंध, दिव्यांग विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट गायकांना व्यावसायिक स्तरावर संधी आणि रोजगार मिळावा म्हणून ‘स्वरकुल’ संस्थेच्या ‘त्यागराज म्युझिक अकादमी’ने स्वखर्चाने या संगीत अलबमची निर्मिती केली आहे.

‘तिमिरातुनी तेजाकडे’ या अलबम मधील दहा गीते महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींनी लिहिलेली आहेत व संगीतकार त्यागराज खाडिलकर यांनी उत्तम वाद्यवृंदासह स्वरबध्द केली आहेत.
*बुधवार दिनांक १ मे २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री. शिवाजी मंदिर दादर, मुंबई येथे भव्य सोहळ्यात पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या शुभ हस्ते आणि प्रसिद्ध निर्माती, दिग्दर्शिका कांचन अधिकारी, हास्यजत्रा फेम अरूण कदम, सविता मालपेकर, विजय पाटकर, जयवंत वाडकर, प्रमोद पवार, चेतन दळवी, विनय येडेकर आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा अलबम प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला ‘केसरी टूर्स’ कडून सहकार्य लाभले आहे.*

या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून अंध, दिव्यांग कलाकारांच्या आयुष्यातील एक दिवस प्रकाशमान करावा, आणि त्यांच्या निरागस मनाला कायमस्वरूपी आनंदाचा ठेवा द्यावा असे आवाहन ‘स्वरकुल ट्रस्ट’ चे विश्वस्त श्री. त्यागराज खाडिलकर आणि डॉ. वीणा खाडिलकर यांनी केले आहे.

अंध, दिव्यांग गायक : अतुल कसबे, विकी दर्जी, आफताब ठाकूर, विजयालक्ष्मी यादव, तेजल व्यास, आरती बाविस्कर, सोनू मालधुरे, सानिका पाटील

गीतकार : – विजय जोशी-डोंबिवली,
प्रदीप पवार-टिटवाळा,
अरुण विघ्ने-वर्धा,
विलास देवळेकर-मुंबई,
डॉ.सुभाष कटकदौंड-खोपोली,
डॉ.बाळासाहेब तोरस्कर-कोल्हापूर,
डॉ.मितेश वेरुळकर-नागपूर,
डॉ.कैलाश कापडे-अमरावती,
सुरेखा गावंडे-कल्याण,
वाणी केरकलमट्टी-डोंबिवली
संगीतकार:-त्यागराज खाडिलकर
*Mo – 8779338562*

प्रतिक्रिया व्यक्त करा