You are currently viewing डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्शवत कार्य डोळ्यासमोर ठेवून..शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे ब्रीद उराशी बाळगून समाजकार्यात पुढाकार घ्या- ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांचे प्रतिपादन..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्शवत कार्य डोळ्यासमोर ठेवून..शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे ब्रीद उराशी बाळगून समाजकार्यात पुढाकार घ्या- ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांचे प्रतिपादन..

वैभववाडी

सडूरे येथील बौद्ध विकास मंडळ आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती सोशल डिस्टंसिंग व कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या शुभ हस्ते फोटो पूजन करून व मंडळाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी काळे बोलत असताना म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे कोणत्या एका जाती-धर्मासाठी मर्यादित नव्हते त्यांचे कार्य सर्व जाती धर्मांसाठी होते त्यामुळे बाबासाहेबांना एका जातीपुरते मर्यादित ठेवू नका.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पदव्या मिळवल्या पण त्याचा वापर स्वतः च्या पोटाची खळगी भरण्यासाठी न करता, या देशामधील सर्व जाती-धर्मांमधील वंचित,शोषित घटकांतील जनतेसाठी या ज्ञानाचा वापर बाबासाहेबांनी अखंड आयुष्यभर केला. शिका संघटित व्हा व संघर्ष करा हे ब्रीद वाक्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उराशी बाळगून कार्य केले तसेच आपण देखील कार्य केले पाहिजे. आपण शिक्षण घेतलं तर आपल्याला काय हवंय हे कळेल, आपण संघटित झालो तर आपण जो संघर्ष उभा करू त्या संघर्षाला सहज यश मिळेल त्यामुळे सर्वांनी या ब्रीद वाक्य चा वापर सत्यात उतरवायचा आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आपल्याकडे जर दोन रुपये असतील एक रुपयाची भाकरी घ्या, व एक रुपयाचे पुस्तक घ्या.. कारण घेतलेल्या भाकरीने एक वेळचं पोट भरेल तर घेतलेल्या पुस्तकाने तुमचे मस्तक सुधरेल आणि सुधारलेले मस्तक कोणासमोर नतमस्तक होनार नाही. आयुष्यभर स्वाभिमानाने जगायला शिकवेल.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणून आदर्शवत कार्य डोळ्यासमोर ठेवून.. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे ब्रीद उराशी बाळगून आपण सर्वांनी समाजकार्यत पुढाकार घ्यावा असे प्रतीपादन ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी केले.
यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष (मुंबई ) काशीराम जंगम यांनी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. जंगम यावेळी बोलताना म्हणाले ज्या बाबासाहेबांनी आमच्या समाजाला चिखलातून बाहेर काढले त्या बाबासाहेबांना आपण विसरू शकत नाही व पुढच्या पिढीने त्यांना विसरून ही नये. समाजातील सर्व बांधवांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे व काम करणाऱ्याला साथ केली पाहिजे, हीच आपल्या बाबासाहेबांची शिकवण होती. बाबासाहेबांमुळे आज आपण हे चांगले व स्वाभिमान दिवस पाहत आहोत.त्यांना आजच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून जंगम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मंडळाचे माजी पदाधिकारी संजय जंगम यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत बाबासाहेबांचे जीववर उपस्थितांना मार्गदर्शन केले.व आभार पर भाषण केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्य आकांक्षा जंगम, मंडळाचे माजी अध्यक्ष (मुंबई) काशीराम जंगम ,शुभांगी जंगम, विद्यमान अध्यक्ष (ग्रामीण) महेंद्र जंगम, सचिव (ग्रामीण) मोहन जंगम, माजी सरपंच प्रमिला जंगम, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय जंगम, ज्येष्ठ नागरिक विठ्ठल जंगम, अमृत जंगम, चंद्रकांत जंगम, रमेश जंगम, जनार्दन जंगम, धर्मेंद्र जंगम, योगेश जंगम,उत्तम कांबळे,बापू कांबळे,अमित सकपाळ, अनिकेत हेळेकर, विशाल हेळेकर, विलास जंगम, महेश जंगम, संचित जंगम, गणेश जंगम तसेच ग्रामस्थ व महिला मंडळ कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − six =