You are currently viewing इळये, आसरोंडी, दाभोळेतील विकासकामांचे मनस्वी घारेंच्या हस्ते भूमिपूजन…

इळये, आसरोंडी, दाभोळेतील विकासकामांचे मनस्वी घारेंच्या हस्ते भूमिपूजन…

इळये, आसरोंडी, दाभोळेतील विकासकामांचे मनस्वी घारेंच्या हस्ते भूमिपूजन…

देवगड

पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून इळये, आसरोंडी, दाभोळ आदी गावांसाठी प्राप्त झालेल्या विविध विकासकामांचे माजी जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या दोन्ही भाजप नेत्यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.

यावेळी इळये आसरोंडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे मंजूर निधी ३४ लाख, पाटथर कुणकेश्वर मुख्य रस्ता सचिन जोशी घर ते करंजेकर घरापर्यंत चा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे मंजूर निधी ५ लाख, दाभोळे सत्वपुरुष मंदिर कडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे मंजूर निधी ५ लाख, आदी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी चिंतामणी घारे, सानिका पवार, लता करंजेकर, सुप्रिया थोटंम, प्रतीक्षा मेस्त्री, अनिता मेस्त्री, सुनंदा मेस्त्री, सचिन जोशी, विजय जोशी, बाळा करंजेकर, सचिन मेस्त्री, गोटू थोटम, शांताराम थोटम, बंटी कदम, प्रतीक कदम, रेश्मा पवार, माधवी पवार आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा