You are currently viewing देवगड ब्राम्हणवाडी येथील मूळ असलेल्या सुनंदा नारायण कोयंडे यांचे ठाणे येथे दुःखद निधन

देवगड ब्राम्हणवाडी येथील मूळ असलेल्या सुनंदा नारायण कोयंडे यांचे ठाणे येथे दुःखद निधन

ठाणे –

देवगड ब्राह्मणवाडी येथील जेष्ठ नागरिक सुनंदा नारायण कोयडे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८३ वर्षाच्या होत्या. पूर्वाश्रमीच्या सुनंदा दत्ताराम कांदळगावकर या मालवण तालुक्यातील आचारा पिरावाडी येथील जेष्ठ सदस्या म्हणून परिचित होत्या. देवगड मधील कै. ल .य .कोयडे यांच्या मोठ्या सूनबाई म्हणून ओळखला जात होत्या त्यांचा स्वभाव लोभसवाणा होता. गावच्या धार्मिक कार्यात सहभागी होऊन सहकार्य करण्यात त्यांचा पुढाकार असे त्यांच्या पश्चात यशवंत, प्रशांत असे दोन मुलगे दोन विवाहित कन्या, दीर जावा, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर वागळे इस्टेट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा