You are currently viewing झुआरी जंक्शनचा अनोखा उपक्रम…

झुआरी जंक्शनचा अनोखा उपक्रम…

बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन

दोडामार्ग

मानवी जीवनासाठी मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा त्यातील एक महत्त्वपूर्ण गरज म्हणजे अन्न ही गरज मानवी जीवनासाठी अत्यावश्यक गरज म्हणून ओळखली जाते व ही पूर्ण करतो तो म्हणजे आपला शेतकरी राजा, म्हणूनच शेतकरी राजाला पूर्ण जगाचा पोशिंदा मानला जातो. आपल्याकडील शेतकरी हा पूर्णता प्रगतशील शेतकरी नसल्याने व आपल्या शेतकऱ्यांना प्रगतशील शेती संदर्भात ज्ञान प्राप्त नसल्यामुळे आपल्या शेतकरी मित्राला शेतीतील उत्पादनात नफा ऐवजी तोटा स्वीकारावा लागतो, हे उद्दिष्ट लक्षात घेता झुआरी कंपनीने आपला शेतकरी प्रगतशील व्हावा व त्याने प्रगतशील शेती करून भरघोस असे उत्पादन प्राप्त करावे या हेतूने गोव्यातील काही भागांमध्ये तसेच दोडामार्ग तालुक्यातील काही भागांमध्ये झुआरी कंपनीची गाडी प्रत्यक्ष गावागावातील शेतकऱ्यांच्या शेतात बांधावर नेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत पिकांविषयी असणाऱ्या त्यांच्या अडचणी दूर करत प्रगतशील शेती कशी करावी या विषयी मार्गदर्शन करत कंपनीच्या नवनवीन उत्पादनाविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.शेतकरी बांधवांनी सुद्धा या कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाची सुरुवात साखळी (कारापूर)येथून सुरू झाली, कार्यक्रमाचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी मधु नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी झुआरीचे अधिकारी श्री.डी.व्ही. तेंडुलकर, श्री.मंदार सावईकर यांच्यासह सागर सावंत, सुमित दळवी, कौशल्य तेंडुलकर, सर्वेश वेळगेकर, विशांत कोळी, सूयश गवस, सखाराम गावकर, प्रेमराज पालकर देवराज गावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 3 =