You are currently viewing सर्व सामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी अनेक उपक्रम जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू करणार – नितेश राणे

सर्व सामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी अनेक उपक्रम जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू करणार – नितेश राणे

गोपाळ सेवा दाता प्रतिनिधी यांची कार्यशाळा संपन्न

 

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) :

जिल्ह्यातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक समृद्धी यावी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी असे अनेक उपक्रम जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून आज आयोजित केलेल्या गोपाळ सेवा दाता कार्यशाळेचा उपयोग स्वतःच्या विकासाबरोबर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी करण्यासाठी हे एक क्रांतीकारी पाऊल जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून टाकले आहे असे मत आमदार तथा जिल्हा बँकेचे तज्ञ्ज संचालक नितेशजी राणे यांनी जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित प्रशिक्षण शिबिरात मांडले.

जिल्ह्यातील दूध संस्थांमध्ये कृत्रिम रेतन सेवादाता निर्माण होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ कोल्हापूर व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप यांच्या मध्ये सामंजस्य करार केला आहे. प्रतिदिनी किमान एक लाख लिटर दूध संकलन करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले असुन त्या अनुषंगाने गोकुळ संघाकडे नाव नोंदणी केलेल्या गोपाळ सेवा दाता प्रतिनिधी यांची कार्यशाळा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भाईसाहेब सावंत सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

यावेळी पुढे बोलतांना आमदार नितेश राणे म्हणाले कि आज जिल्हा बँक केंद्रीय मंत्री मा.नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या आर्थिक विकासाचे ध्येय्य डोळ्यासमोर ठेऊन विविध उपक्रम राबवित आहे. त्याचा फायदा तळागाळातील सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी साहेब म्हणाले की, कोल्हापूर, सांगली तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता दुग्ध व्यवयायात तेथे एआय वर्कर चे योगदान फार महत्त्वाचे आहे. आणि आपल्या जिल्ह्याचा भौगोलिक परिसराचा विचार करता एआय वर्करच्या माध्यमातून त्वरीत प्राथमिक उपचाराची सेवा मिळणे आवश्यक आहे. आणि हा केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील वेगळा प्रयोग म्हणून बँक या उपक्रमाकडे पहाते आहे. यासाठी भरीव आर्थिक योगदान या चारही संस्थांनी दिलेले असून या नाविन्यपूर्ण उपक्रमातील उत्स्फुर्त सहभागा बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, भगिरथ प्रतिष्ठान चे डॉ. प्रसाद देवधर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनाला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जि. प. पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सुधाकर ठाकूर, राज्यस्तरीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विद्यानंद देसाई, गोकुळ चे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रेडकर, गोकूळ दुग्ध संकलन अधिकारी अनिल शिक्रें, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बँकेचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील गोपाळ सेवा दाता लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =