You are currently viewing साहित्य प्रेरणेचा रुपेरी कट्टा

साहित्य प्रेरणेचा रुपेरी कट्टा

*साहित्य प्रेरणेचा रुपेरी कट्टा*
(आजगाव पंचक्रोशीतील साहित्यसेवा चळवळ )

मांद्रे- गोवा येथे ‘ साहित्य संगम ‘ नावाची एक साहित्य संस्था सुमारे तीस वर्षे कार्यरत आहे. चार वर्षांपूर्वी त्या संस्थेशी माझा स्नेह जुळला. त्यातूनच आजगावला तशीच साहित्य चळवळ सुरू करावी, असे वाटले. मग दिनांक २ ऑक्टोबर २०१८ रोजी आजगाव येथे ‘साहित्य प्रेरणा कट्ट्याचा’ जन्म झाला. पंचक्रोशीतील साहित्य प्रेमी यात सहभागी असतात. पहिल्या सभेला २२ सदस्य उपस्थित होते. आतापर्यंत दर कार्यक्रमात साधारणपणे १५-२० सदस्य उपस्थित असतात.


सलग १७ मासिक कार्यक्रम झाल्यानंतर कोरोनाचे संकट आले आणि फेब्रुवारी २०२० नंतर थांबावे लागले. निर्बंध मुक्त झाल्यावर पुन्हा २ एप्रिल २०२२ रोजी कट्टा पुन्हा सुरू केला. त्यानंतर सलग सात कार्यक्रम झाले. आता २० नोव्हेंबर २०२२रोजी कट्ट्याचा पंचविसावा कार्यक्रम आयोजित करीत आहोत.


आतापर्यंत श्री.राजन खान, डाॅ.सुधाकर ठाकूर- कुडाळ, डाॅ. मधुकर घारपुरे- सावंतवाडी, सौ.वृंदाताई कांबळी-वेंगुर्ला, वैशाली पंडित-मालवण, माधुरी आठल्ये-ऐरोली, देवदत्त परुळेकर- वेंगुर्ला, रामचंद्र धाकोरकर- सावंतवाडी, गजानन मांद्रेकर व सुभाष शेटगावकर-गोवा यांनी कट्ट्यावर हजेरी लावली आहे. यापैकी डाॅक्टर ठाकूर व डाॅक्टर घारपुरे हे कट्ट्याचे सदस्यच बनले. कट्ट्यावर एका पुस्तकाचे प्रकाशन झाले असून अजून एका पुस्तकाचे प्रकाशन या पंचविसाव्या कार्यक्रमात करायचे योजले आहे. कट्ट्याचा एक कार्यक्रम साहित्य संगम सह संयुक्तपणेही केला गेलाय.
कट्ट्याचा कार्यक्रम एक तासाचा असावा, तो दरमहा असावा, वेळेत सुरू होऊन वेळेतच संपावा, पैसे गोळा करू नयेत ,कट्ट्याला पदाधिकारी नेमू नयेत, स्वेच्छेने चहापान द्यावे पण कोणतीच आर्थिक देवाणघेवाण करू नये, असे नियम बनवले होते; त्या नियमांचे आजतागायत पालन केले गेलेय.
आता रविवार दिनांक २० नोव्हेंबरला कट्ट्याचा पंचविसावा कार्यक्रम होतोय. यात कविता,गीत, ललित असे सादरीकरण होईलच,पण एका पुस्तकाचे प्रकाशनही होईल. मुलांना गोडी लागावी म्हणून गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील एकेका मुलाला सादरीकरणाची संधी दिलीय.
आजगाव वाचनालयात सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला साहित्य चळवळीला शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आपण उपस्थित रहावे, अशी विनंती कट्ट्याच्या वतीने मी करतोय.

स्थळ: आजगाव वाचनालय
रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२
वेळ : सायंकाळी ४ वाजता.

*विनय सौदागर*
समन्वयक- सा.प्रे.क.
आजगाव, सावंतवाडी
सिंधुदुर्ग 9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा