You are currently viewing देवबाग येथील विठ्ठल मंदिराचा आज कलशारोहण सोहळा…

देवबाग येथील विठ्ठल मंदिराचा आज कलशारोहण सोहळा…

देवबाग येथील विठ्ठल मंदिराचा आज कलशारोहण सोहळा…

मालवण
देवबाग येथील श्री देव विठोबा देवालयाच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त देवबाग गाव विठ्ठलमय झाले असून देवबाग वासियांमध्ये चैतन्य पसरले आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक विधी व होमहवन संपन्न झाले. आज दि. २६ एप्रिल रोजी मंदिराचा कलशारोहण सोहळा श्री नवनाथ श्रध्दास्थान तपोभूमी मुळदे कुडाळ येथील नवनाथ उपासक प. पू. बाळकृष्ण घडशी महाराज यांच्या हस्ते कलश व ध्वजारोहण, पूज्य रमेश महाराज, सनातन संस्थेचे सद्‌गुरु सत्यवान कदम यांची उपस्थिती
संपन्न होणार असून या सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित आहेत.

देवबाग येथील श्री देव विठोबा मंदिराचा कलशारोहण सोहळा दि. २६ एप्रिल रोजी तसेच श्रींच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन दि. ३० एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त १६ एप्रिल पासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्त मंदिरावर आरोहण करण्यात येणाऱ्या कलशाची भव्य मिरवणूक काल सायंकाळी काढण्यात आली. यानिमित्त काल सकाळपासून विठोबा मंदिरात प्रासाद शुद्धी, देवता स्थापना होम हवन, गो प्रवेश आदी धार्मिक विधी संपन्न झाले. यजमानी म्हणून श्री. किशोर नांदोस्कर व सौ. नेत्रा नांदोस्कर या दाम्पत्याच्या हस्ते हे विधी झाले. यावेळी मंदिराचे पुजारी सुरेश काळे तसेच पुरोहित मंदार मेहंदळे (सांगली), आदित्य दाते, चैतन्य कुळकर्णी, राजेश जोशी, केदार मेहंदळे यांच्या पौरहित्याखाली हे विधी संपन्न झाले. यावेळी श्री नवनाथ श्रध्दास्थान तपोभूमी मुळदे कुडाळ येथील नवनाथ उपासक प. पू. बाळकृष्ण घडशी महाराज उपस्थित होते. तर दुपारी ३ वा. सुहासिनीची जल कलश परिक्रमा संपन्न झाली. यावेळी बहुसंख्य भाविक व देवबाग ग्रामस्थ उपस्थित होते.

आज शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. देवतामूर्ती व कलशाला जलाधिवास, श्री गणेश व श्री शिवपिंडी प्रतिष्ठापना, सकाळी १०.३० वा. श्री नवनाथ श्रध्दास्थान तपोभूमी मुळदे कुडाळ येथील नवनाथ उपासक प. पू. बाळकृष्ण घडशी महाराज यांच्या हस्ते कलश व ध्वजारोहण, पूज्य रमेश महाराज, सनातन संस्थेचे सद्‌गुरु सत्यवान कदम यांची उपस्थिती, दुपारी १२ ते ३ वा. आरती व महाप्रसाद, सायं. ५ ते ८ वा. श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक दिंडी मंडळ, आचरा-पारवाडी, देवबाग रात्री १० वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार मंडळ कवठी यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘अजिंक्य मणी’, शनिवार दि. २७ एप्रिल रोजी रात्री १० वा. वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘अघोर लक्ष्मी’, दि. २८ एप्रिल रोजी रात्रौ १० वा. खानोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘मातृवात्सल्य’, सोमवार, दि. २९ एप्रिल रोजी श्री भूमिका देवी दशावतार (नितीन आशयेकर) यांचा पौराणिक रात्रौ १० वा. नाट्य प्रयोग ‘चित्रांगी गंधर्व उ‌द्धार’ सादर होणार आहे.

दि. ३० एप्रिल रोजी श्री विठ्ठल रखुमाई मुर्ती प्रतिष्ठापनेचा ७९ वा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ७ वा. श्रींच्या मुर्तीवर दुग्धाभिषेक, सकाळी ८ वा. ओटी भरणे कार्यक्रम सायं. ४ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ६. वा. पुराण वाचन, पालखी प्रदक्षिणा, महाआरती व तीर्थप्रसाद, रात्री ८ वा. भजनाचा कार्यक्रम, रात्री १० वा. आरोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘पुष्करणी तीर्थ’ दि. १ मे रोजी पहाटे ५ वा. काकड आरती, दुपारी १२ ते ३ वा. महाप्रसाद, रात्री १० वा. जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे. तरी सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव विठोबा देवालय, देवबाग विश्वस्त व ग्रामस्थ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा