दोडामार्गात कामगारांमध्ये फ्री टाइल्स मारामारी

दोडामार्गात कामगारांमध्ये फ्री टाइल्स मारामारी

दोडामार्ग :

तालुक्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार कामानिमित्त स्थायिक झाले आहेत. दोडामार्ग शहरात देखील लोंडे वाढत चालले आहेत. शनिवारी दोडामार्ग बाजारपेठेत तहसीलदार निवासस्थान इमारती समोर आर्थिक देवाण-घेवाण वरून दोडामार्ग येथील व झरेबांबर येथे वास्तव्य करुन असलेल्या परप्रांतीय कामगारात फ्री टाइल्स हाणामारी झाली. एका युवकावर पंधरा ते वीस जण तुटून पडले. अखेर स्थानिकांनी पुढे येऊन त्यांना बाजूला केले पोलिस स्थानकात फोन लावला. तोपर्यंत काही जण बाजूला गेले. जर बाजूला केले नसते तर एकाला बेदम प्रसाद देऊन जायबंदी केले असते. सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली.

काही कामगार उपचारासाठी दोडामार्ग रुग्णालयात गेले होते. दोडामार्ग बाजारपेठेत सायंकाळी पाच वाजता पणजी रस्त्त्यावर तहशीलदार कार्यालय निवासस्थान इमारती समोर सुरुवातीला तिघांमध्ये कामाच्या पैशावरून वाद सुरू झाले. धक्काबुकी सुरू झाली एकमेकांना खाली पाडले. दोघांच्या तोंडातून रक्त देखील आले. त्यामुळे एकाने अंगातील रेन कोट काढून झरेबांबर येथील लाल टी शर्ट घातेलेल्या युवकाला मारहाण केली. मारहाण सुरू आहे हे समजताच दोडामार्ग येथील परप्रांतीय कामगार त्यांची बायका मुले अल्पवयीन मुले यांनी त्या लाल टी शर्ट घातेलेल्या युवकाला घेरून बेदम मारहाण करायला सुरुवात केली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, उदय मयेकर, पञकार तुळशीदास नाईक यांनी या कामगारांना बाजूला केले. तरी महिला तुटून पडल्या त्यामुळे सोडावायला गेलेल्यांची अडचण झाली. महिलांना कसं रोखणार. अखेर त्या युवकाची कशी बशी सुटका करून त्याला त्याच्या इतर साथिदार सोबत परत पाठवले नाही तर मोठा अर्नथ घडला असता. चेतन चव्हाण यांनी पोलिस स्थानकात फोन लावला या नंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत हे कामगार घरी निघून गेले. पण या परप्रांतीय कामगार यांची फ्री टाइल्स हाणामारी दोडामार्ग शहरात चांगलीच चर्चा रंगली.

प्रतिक्रिया व्यक्त करा