You are currently viewing कुडाळ शहरातील युवकांचा मनसेत प्रवेश…

कुडाळ शहरातील युवकांचा मनसेत प्रवेश…

कुडाळ

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिन व सदस्य नोंदणी उपक्रमाचे औचित्य साधून शहरातील युवकांनी मोठ्या संख्येने मनसेत प्रवेश केला.  जिल्हाध्यक्ष धीरज परब त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा प्रवेश करण्यात आला. जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी मुंबई वाहतूक सेना चिटणीस रवी निगुडकर, परिवहन सेना उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, उपतालुका अध्यक्ष जगन्नाथ गावडे, माजी तालुकाध्यक्ष मालवण गणेश वाईरकर, सिद्धांत बांदेकर आदींसह मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =