खेमराज प्रशालेचे विज्ञान प्रदर्शनात यश*
विद्यार्थी विघ्नेश यशवंत माधव यांनी पटकावले द्वितीय पारितोषिक*
बांदा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे प्रसिद्ध असलेले ठिकाण आंबोली येथे थंडीच्या दिवसात संपन्न झालेल्या ५२ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल मध्ये घेण्यात आले होते. त्या प्रदर्शनात सावंतवाडी तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.बांदा येथील खेमराज प्रशालेच्या माध्यमिक गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.या गटाचे प्रतिनिधित्व विद्यार्थी विघ्नेश यशवंत माधव यांनी केले होते. खेमराज प्रशालेचे प्रयोगशाळा सहाय्यक श्री.सूर्यकांत चव्हाण यांनी प्रयोगशाळा सहाय्यक परिचर गटातून प्रथम क्रमांक पटकावला.विद्यार्थी विघ्नेश याने कार्बन अब्सोरप्शन अँड पुरिफिकेशन सिस्टम (Carbon Absorption and purification system) ह्या प्रोजेक्टची मांडणी केली होती.ही मांडणी व्यवस्थित रित्या प्रदर्शित करून परीक्षकांच्या विचारलेल्या प्रश्नांना अचूक उत्तरे दिली व हा प्रोजेक्ट जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे हे परीक्षकांना पटवून दिले. त्यामुळे त्याच्या प्रोजेक्टला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मित्र व सावंतवाडी तालुक्यातून या दोघांचेही कौतुक होत आहे.