You are currently viewing एस.पी.के च्या राजारामची मुंबई विद्यापीठाच्या क्रिकेट संघात निवड…

एस.पी.के च्या राजारामची मुंबई विद्यापीठाच्या क्रिकेट संघात निवड…

सावंतवाडी

येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा विद्यार्थी राजाराम गवस याची मुंबई विद्यापीठ क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. १९६१ पासून प्रथमच मुंबई विद्यापीठ क्रिकेट संघामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे .राजाराम गवस याने खुप परिश्रम घेऊन मुंबई विद्यापीठ संघामध्येआपली निवड निश्चित केली व महाविद्यालयाचे नाव

क्रिकेटविश्वात रोशन केले. या उज्वल यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांच्या हस्ते राजाराम गवस याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल. भारमल, संस्थेचे सदस्य जयप्रकाश सावंत , महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. सीए नाईक, प्रा.एम.ए.ठाकुर उपस्थित होते. सर्वांनी त्याचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − twelve =